बाळ बोठे यास अटक करणाऱ्या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान 

0
175
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट) 
अहमदनगर येथील बहुचर्चित रेखा जरे खून खटल्यातील फरार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे यास हैद्राबाद येथुन पकडुन आणलेल्या पोलीस पथकात समावेश असलेले जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगर जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेली काही महिन्यांपासून बाळ बोठे हा पोलीस खात्यास गुंगारा देत होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जे पोलीस पथक बाळ बोठे यास पकडून आणण्यासाठी हैद्राबादला पाठवले होते व त्याला पकडून आणण्याची कामगिरी ज्यांनी केली त्या पथकात जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, यांचे समावेत पोलीस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे, संग्राम जाधव व चालक असलेले हेड कॉन्स्टेबल आडसूळ यांचा समावेश होता.
या सर्वांना पोलीस अधीक्षक यांच्या प्रशस्तीपत्र देऊन जो सन्मान करण्यात आला त्या बद्दल जामखेडच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सन्मानाबद्दल या सर्वांचे अभिनंदन होत आहे.
   संभाजी गायकवाड यांनी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारताच तालुक्यातील अवैद्य धंद्यावर कारवाईला सुरूवात केली, शहरातील वाहतुकीला शिस्त लावली, अवैध हत्यारे बाळगणांऱ्यावर कारवाई केली, रोड रोमिओ चा बंदोबस्त केला काही चोरीच्या मोटारसायकलचा ताबडतोब शोध लावला
अशा धडाकेबाज कामगिरीमुळे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली. पोलीस अधीक्षक यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here