जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
भविष्यात चांगले दिवस बघावयाचे असेल तर प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. कारण वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार नाहीत. त्यामुळे वृक्षारोपण करुन मुलांप्रमाणे झाडांचीही काळजी घेणे गरजेचे आहे असे मत मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले.

वृक्ष माणसाचे जीवन फुलांनी सुगंधित करून फळांनी रसभरित करतात. पण मानव वृक्षतोड करून आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतो. त्यामुळे वृक्षारोपण ही नितांत गरज ठरली आहे.

याच अनुषंगाने रविवार दि १४ अॉगस्ट रोजी सकाळी जामखेड नगर परिषद व संत निरंकारी मंडळ ट्रस्ट जामखेड यांच्या संयुक्त विद्माने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर गल्ली या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी मुख्याध्याकारी मिनीनाथ दंडवते, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, संत निरंकारी ट्रस्ट चे मुखी अमित गंभीर,

जि.प. तपनेश्वर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश मोहिते, नगरसेवक मोहन पवार, शिक्षक समिती चे अध्यक्ष महेंद्र आदे, संतोष घोलप, संजय आरेकर, शाळेतील शिक्षिका श्रीम. राक्षे, श्रीम. शुभांगी सांळुके, संत निरंकारी ट्रस्ट च्या श्रीम. रेखा गंभीर , श्रीम.रश्मी गंभीर, पियुष गंभीर, अमोल जमदाडे, नगरपरिषदेचे आकाश डोके आदी शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते.