जामखेड न्युज——
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (vinayak mete death case) यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही प्रश्न उपस्थिती केले जात आहे. अशातच बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग (Call recording viral) व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणानुसार 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) अपघाती निधन झालं. मेटे यांच्या गाडीच्या ज्या प्रकार अपघात झाला, त्यावरून काही प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. अण्णासाहेब मायकर असं त्यांचं नाव आहे. अण्णासाहेब मायकर हे 3 ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते.
या फोन कॉल रेकॉर्डमधील संवादानुसार, तीन ऑगस्टला विनायक मेटे यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे जात होतो. त्यावेळी शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या. यामध्ये आयशर ट्रक देखिल होता. शिक्रापूरपासून ही गाडी पाठलाग करत होती, ती गाडी कधी पाठीमागे राहत होती तर कधी ओव्हरटेक करून पुढे जात होती, यामध्ये आयशर एक ट्रक सुद्धा होता, त्यामुळे आम्हाला काही पुढे जाता येत नव्हते, अशी माहिती मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी दिली.
शिक्रापूरजवळ एक गाव होतं. तिथे अडीच किलोमिटरपर्यंत आमचा पाठलाग करण्यात आला होता. ती गाडी मागे येत होती, पुढे जात होती. रात्री हा प्रकार घडला होता. या गाडीतील माणसं आम्हाला हात दाखवत होती. आम्ही गाडी थांबवून चौकशी करणार होतो, त्यावेळी मेटे साहेबांनी गाडीचा नंबर घेऊन ठेव, असं सांगितलं.
बीडमधून मुंबईला निघालो होतो, रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली.
जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीमध्ये होती, असंही मायकर यांनी सांगितलं.
या घटनेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितलं होतं. त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोरे यांना सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, असंही मायकर यांनी सांगितलं.