जामखेड न्युज——
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या संध्या सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकीतुन नायगाव येथील शाळांना प्रथमोपचार पेटी देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे.

जामखेड येथील नायगाव गावातील सर्व शाळेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॅाग्रेस पुणे विभागीय अध्यक्ष व नायगाव ग्रामपंचाय संदस्या संध्या उद्धव सोनवणे यांचनी सर्व शाळांना
प्राथमिक प्रथमोपचार पेटी वाटप करून अमृत महोत्सव साजरा केला आहे.

यावेळी सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ, सरपंच ,उपसरपंच ,सदस्य, सामाजिक कार्यकर्ते अशोक लेंडे, असरू उगले ,चंद्रकांत उगले,बाबासाहेब उगले ,विनोद उगले,भीमराव लेंडे,नंदू उगले ,भारत उगले, युवराज उगले, गणेश उगले तसेच सर्व शाळेंचे प्राचार्य कोल्हे सर,साळवी सर,मडके सर,लव्हाले सर आणि सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येंन उपस्थित होते.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आणि पंचक्रोशी रयत शाळा याचा वतीने . विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. व मोठ्या उत्सवा मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला.

यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे.