तालुक्यातील वंजारवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

0
187
  कधी बिबट्याची दहशत तर कधी रानडुक्करांचा हल्ला यातच आता रानगव्याचा तालुक्यात वावर तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतात गव्याचे दर्शन झाले. या गव्याने शेतात काम करत आसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने ताबडतोब या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वंजारवाडी येथील जायभाय वस्ती येथे शेतकरी संतोष भिमराव दराडे हे आपल्या शेतात काम करीत असताना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक या गव्याने शेतकर्‍यावर हल्ला केला. या नंतर ग्रामस्थांना देखील या गव्याचे दर्शन झाले. या नंतर ग्रामस्थांनी या गव्याचा पाठलाग केला मात्र नंतर अंधाराचा फायदा घेत गवा पळुन गेला. जखमी संतोष दराडे यांना फक्राबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जंगली गव्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे. जामखेड तालुक्यात वारंवार वनवा पेटणे, सर्प आढळुन येणे, व रानडुक्करांचे नागरीकांवर हल्ले होणे हे प्रक्रार वारंवार घडत आहेत. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here