जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
तालुक्यातील डिसलेवाडी येथील काही मजुर सोनेगाव परिसरात ट्रॅक्टर घेऊन मजुरीसाठी जात आसताना तरडगाव सोनेगाव रस्त्यावर ट्रॅक्टर बंद पडल्याने काय झाले म्हणून नाना तुकाराम डिसले (वय ३८) हे खाली उतरले असता पाठीमागून एक ऊसाचा ट्रॅक्टर आला व डिसले यांच्या अंगावर गेल्याने नाना डिसले यांचा जाग्यावरच मृत्यू झाला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डिसलेवाडी येथील काही मजुर मजुरीसाठी सोनेगाव परिसरात ट्रॅक्टर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचे लग्न तरडगाव येथे असल्याने लग्नाच्या ठिकाणी भेट दिली व पुढे सोनेगाव कडे चालले होते तेव्हा ट्रॅक्टरचा बिघाड झाल्याने नाना डिसले हे खाली उतरले काय झाले हे पाहत असताना एक ऊसाने भरलेला ट्रॅक्टर आला या ट्रॅक्टर समोर मोठ्या प्रमाणावर शो केलेला होता त्यामुळे समोरचे काही दिसले नसावे यात नाना डिसले यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर निघून गेला होता नंतर पाठलाग करत तो पकडला ट्रॅक्टर तरडगाव येथील असल्याचे समजते

मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ग्रामीण रुग्णालयात युवा नेते दादासाहेब ( हवा) सरनोबत, सरपंच बापुसाहेब कार्ले यांच्या सह अनेक ग्रामस्थ हजर होते. डिसले यांच्या मागे आई वडील एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.