खुरदैठण सेवा संस्थेत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचा सर्वच्या सर्व जागेवर दणदणीत बहुमताने विजय पारदर्शक कारभारामुळे विजय मिळालेल्या संस्थेत सभासदांचे हित जोपासणार – प्रा. महादेव डुचे, विरोधकांना शंभरीही पार करता आली नाही

0
245
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
कर्जत-जामखेडचे कार्यकुशल व युवकाचे आयकाँन असलेले आमदार रोहित (दादा) पवार तसेच जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव डुचे यांच्या नेतृत्वाखाली खुरदैठण सेवा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा सर्वच्या सर्व जागेवर दणदणीत बहुमताने विजय संपादन केला आहे त्यामुळे अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या सेवा संस्थेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सेवा संस्थेचा पारदर्शक कारभार करत सभासदांचे हित जोपासले कोणत्याही सभासदांना कधीच कुठलिही अडचण येऊ दिली नाही. स्वतंत्र शेतजमीन नावावर असणाऱ्या शंभर टक्के सभासदांना कर्जवाटप केले यामुळे सभासदांनी पुन्हा शेतकरी विकास पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले आहे
   बिनविरोध निवड झालेले उमेदवार अनुसूचित जाती जमाती समुद्र दास बाबाजी, भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये मदने जयवंता रामभाऊ तर महिला राखीव मध्ये ठाकरे शितल भाऊसाहेब, डुचे सखुबाई भगवान हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते तर
 नऊ जागांसाठी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे निवडणूक आले आहेत
सर्वसधारण कर्जदार डुचे बाजीराव भानुदास, डुचे भिमराव श्रीराम, डुचे दिंगाबर तुकाराम, डुचे मोहन चंद्रभान, डुचे संजय बाजीराव, डुचे सुरेश मधुकर, इंगळे गहिनीनाथ रामभाऊ, सांगळे नानासाहेब चत्रभुज तर इतर मागास प्रवर्गात डुचे महादेव शिवाजी सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडूण आले विरोधकांना शंभरीही पार करता आली नाही. 
शेतकरी विकास पॅनलचा बहुमताने विजय झाल्याबद्दल कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, मंगेश (दादा) आजबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कालिका गॅस एजन्सीचे संचालक निलेश तवटे, रविंद्र कडलग, धनंजय कार्ले, मनोज कुलथे, सागर अंदुरे, सागर सदाफुले, संजय वराट सर, सरपंच ओंकार डुचे, माजी उपसरपंच बाळासाहेब आजीनाथ ठाकरे, अविनाश ठाकरे, उपसरपंच हनुमंत देवकाते, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश डुचे, धान्य दुकानदार बाळासाहेब बाबासाहेब ठाकरे, मनोहर बाबासाहेब डुचे, विजय गहिनीनाथ डुचे, विजय भगवान डुचे, सुग्रीव ठाकरे सर, चंद्रकांत डुचे सर, मोहन डुचे सर, गोवर्धन काशिनाथ डुचे, अंकुश सांगळे दुध संघ चेअरमन, सतिष उद्धव डुचे, सतिष कल्याण डुचे, सतिष ठाकरे मेजर, विक्रम बलभीम डुचे, नितीन सर्जेराव डुचे,
गणेश श्रीहरी डुचे, भाऊसाहेब सांगळे, दादासाहेब रामकिसन डुचे, सुभाष डुचे, राम सांगळे, संजय ठाकरे, दिपक सांगळे, गौतम सांगळे, पांडुरंग नाथा डुचे, सुरज डुचे, सचिन डुचे सर, अक्षय ठाकरे, कांतीलाल ठाकरे, दत्तात्रय उद्धव डुचे, अमोल डुचे, हरिदास विनायक डुचे, अर्जुन श्रीरंग डुचे, अविनाश डुचे, कृष्णा कैलास डुचे, प्रकाश समिंदर माजी ग्रामपंचायत सदस्य, रावसाहेब घोगरदरे, लक्ष्मण घोगरदरे, दिलीप घोगरदरे,श्रीराम डुचे, मारूती डुचे, भाऊ ठाकरे, राम फिटर, दत्तात्रय वाकळे, कांतु डुचे, लक्ष्मण वाकळे यांच्या सह सर्व सभासद व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेशकुमार मुंडे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here