जामखेड न्युज – – –
आज गझल हा काव्यप्रकार सर्व थरांतून लोकप्रिय होत असल्याने नवोदित कवींनी गझल लेखन करताना लेखन तंत्राचे नियम पाळून जबाबदारीने गझल लेखन करावे ” असे विचार प्रख्यात गझलकार प्रा.तुकाराम पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘ गझल तरंग’ या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.आपल्या भाषणात प्रा.पाटील पुढे म्हणाले की, शहरात गझलचे कार्यक्रम गझल मुशायरा, गझल मैफल या नावाने होतात.परंतु गझलमध्ये एका मागून एक शेर येत असल्याने जामखेडचे मराठी साहित्य प्रतिष्ठानने ‘ गझल तरंग ‘ असे सूचक व समर्पक नाव देऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्या ने मराठी भाषेच्या विकासासाठी ग्रामीण भागातील या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे ” असे गौरवपूर्ण विचार मांडले.
मराठी साहित्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष व प्रसिद्ध लेखक
आ.य.पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ शेख इक्बाल मिन्ने, डॉ राज रणधीर, डॉ संजय बोरुडे, प्रा.तुकाराम पाटील, इंजिनिअर शैलजा कारंडे, आदि निमंत्रित मान्यवर कवींनी प्रेम, राजकारण, समाज, देशसेवा आदी विषयांवरीलगझला गाऊन व वाचून दाखवून रसिकांनची मने जिंकली. सूत्रसंचालन डॉ शेख मिन्ने यांनी केले, याप्रसंगी प्रा.मधुकर आबा राळेभात यांचा महाविद्यालयीन सेवापूर्ती निमित्ताने प्रा.राळेभात व सौ राळेभात यांचा प्रतिष्ठान चे वतीने शाल, श्रीफळ व पोषाख देऊन प्रा, पाटील, डॉ विद्या काशीद, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसगी गुलाबराव जांभळे यांनी प्रा.राळेभात यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यावर समयोचित भाषण केले.
श्री नागेश विद्यालयाच्या वतीने श्री हरिभाऊ बेलेकर यांनी शाल, श्रीफळ देऊन प्रा.राळेभात यांचा सत्कार करण्यात आला.प्रा मोहनराव डुचे यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमास प्राचार्य कुसुम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य नरके , नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके, डॉ संजय राऊत, डॉ जतीन काजळे,कुंडल राळेभात, डॉ विद्या काशीद, बोलभट सर , गुलाबराव जांभळे सरसमकर सर आदी मान्यवरासह
विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.