जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा पाणी प्रदुषणामुळे बंद करत वराट कुटुंबियांनी अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच झाडे लावून त्याच्या खड्ड्यात केले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम वराट कुटुंबियांनी केले आहे.
पिराजी वराट (बापू) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले ते खुपच धार्मिक प्रवृत्तीचे होते परिसरातील लोक त्यांना आदराने बापू म्हणत. त्यांच्या निधनानंतर
सर्व धार्मिक विधी केल्या पण अस्थी विसर्जन नदीत केल्याने पाण्याचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते. म्हणून वराट कुटुंबियांनी पाहुणे गायकवाड, घोलप सर्वानी विचारविनिमय करून अस्थी विसर्जन नदीत न करता घराच्या जवळच शेतात झाडांसाठी खड्डे घेतले त्या खड्ड्यात अस्थी विसर्जित केल्या व झाडे लावली. बापुंची आठवण म्हणून या झाडांचे चांगले संगोपन करण्यात येईल असे त्यांचा मुलगा महादेव वराट (सर) यांनी सांगितले.

त्यांच्या तेरावा विधीच्या कार्यक्रमानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.