जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी जामखेड नगरपरिषदेमार्फत मोकाट डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी तामिळनाडू येथील पथकामार्फत पंधरा दिवसांत संपुर्ण डुकरे पकडून योग्य ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे पंधरा दिवसांत जामखेड शहर डुक्कर मुक्त होणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये जामखेड नगरपरिषदेने सहभाग घेतला आहे व आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी शासकीय यंत्रणेसोबत निमशासकीय व व्यापारी व नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला जात आहे. वेगवेगळे ठिकाणी स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी प्रभाग वीस व पाच मध्ये स्वच्छता हि लोकचळवळ बनवली आहे. दररोज सकाळी दोन तास प्रभागातील लोक एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवतात.
जामखेड नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर मोकाट डुक्करांचा वावर आहे. अनेक वेळा या डुक्करांनी लहान मुलांवर प्राणघातक हल्ले केलेले आहेत अनेक तक्रारी याबाबत होत्या तसेच ही डुकरे शहरात मोठय़ा प्रमाणावर घाण करतात याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. डुकरे सोडणारे शहरातील काही प्रतिष्ठित लोक आहेत. पण ते पुढे येत नव्हते. आता नगरपरिषदेने डुकरे पकडण्याची व त्यांची विल्हेवाट लावण्याची मोहिम सुरू केल्याने डुक्करांचे मालक खडबडून जागे झाले आहेत व आम्ही आमची डुकरे पकडून नेतो असे नगरपरिषदेस सांगितले आहे.
जामखेड न्युजशी बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले की. तुम्ही तुमचे डुकरे पकडून न्या शहरात एकही डुक्कर दिसता कामा नये. आमची सलग पंधरा दिवस मोहिम सुरू राहणार आहे व शहर डुक्कर मुक्त होणार आहे.

जामखेड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. स्वच्छतेची कामे जोरदारपणे सुरू आहेत. मोकाट डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषदेने तामिळनाडू येथील 25 लोकांचे पथक डुकरे पकडण्यासाठी बोलावले आहे दररोज 150 डुकरे पकडण्याचे उद्दिष्ट त्याच्यावर आहे. हे काम सलग पंधरा दिवस चालणार आहे त्यामुळे पंधरा दिवसांत जामखेड शहर डुक्कर मुक्त होणार आहे. आज सुमारे 150 डुकरे पकडण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले.