जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर अफुची झाडे शेतात लावली आसल्याची गुप्त माहिती जामखेड पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड त्यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकून शेतात लावलेली 1 लाख 70 हजारांची रूपयांची 56 किलो वजनांची झाडे जप्त केली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की जामखेड तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या शेतात अफुची झाडे लावली आहेत. त्यामुळे दि. 25 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्वतः त्या ठिकाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जायभाय, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे यांच्या पथकासह त्या ठिकाणी गेले व खात्री करुन घेतली व त्या ठिकाणी जाऊन पाहिले आसता आरोपी वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधिल शेतात 56 कीलो वजची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किंमतीची अफुची झाडे लावली आसल्याचे आढळून आले. त्या नुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या ठिकाणी छापा टाकून सर्व झाडे जप्त केली असुन आरोपीस अटक केली आहे. घटनास्थळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी देखील भेट दिली आहे.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.