जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनचे सद्गुरू संत हरदेव सिंहजी महाराज जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनचे वृक्षारोपण, वृक्ष संरक्षण व स्वच्छता अभियान आज दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत जामखेड तपनेश्वर रोड अमरधाम स्मशानभूमी येथे वृक्षारोपण, वृक्ष संरक्षण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सद्या आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. जामखेड नगरपरिषदेनेही स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत जामखेडाचा देशात पहिल्या पाच क्रमांकांत नंबर यावा यासाठी कंबर कसली आहे आहे. याच पार्श्वभूमीवर येथील संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या जामखेड शाखेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आली. व स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड हरित जामखेड साठी आपला खारीचा वाटा उचलला आहे.

यावेळी उपस्थित जामखेड शाखेचे प्रमुख अमित गंभीर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे व त्यांची टीम, प्रा. कुंडलजी राळेभात, दिपक मोरे, रवी जमदाडे, श्याम जमदाडे. अमोल जमदाडे, प्रशांत आरोरा, अखीलेश डाडर, ओम सूर्यवंशी, ईश्वर सुर्यवंशी, तसेच महिला स्वयंसेविका रेखा गंभीर, रश्मी गंभीर, सूर्यवंशी ताई, राजश्रीताई, वंदनाताई राळेभात, दिपाली शहा, सृष्टी गंभीर, वैशाली राळेभात आदिंसह संत निरंकारी मिशनचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.