Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड नगरपरिषदेच्या मतदार यादीत दोन हजारांहून अधिक हरकती

जामखेड नगरपरिषदेच्या मतदार यादीत दोन हजारांहून अधिक हरकती

0
303
जामखेड प्रतिनिधी
     जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
जामखेड नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर २ हजार ६७ हरकती प्राप्त झाल्या होत्या.
मतदार यादीच्या हरकतीचा निपटारा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या अध्यक्षतेखाली
चार जणांची समिती नियुक्त केली आहे. त्याचा चार दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मतदार ज्या ठिकाणी राहत असेल त्याच प्रभागात नाव राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. जामखेड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. या मतदार यादीत एका प्रभागात मतदार राहतो तर दुसऱ्याच प्रभागात मतदान या सावळ्या गोंधळामुळे मतदार संभ्रमित झाला होता. याबाबत दिनांक २२ फेब्रुवारी पर्यंत २०६७ हरकती नगर परिषदेला प्राप्त झाल्या.
या प्राप्त हरकतींचा निपटारा करण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. तहसील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नियुक्त समितीच्या सर्व सदस्यांची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते उपस्थित होते.
     चौकट
मतदार यादीसंदर्भात अनेक हरकती प्राप्त झाल्या होत्या जिल्हा पुरवठा अधिकारी ह्या मतदार यादी निश्चितीच्या प्रमुख आहेत. तेव्हा चार दिवसात स्थळ पाहणी करून जो मतदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याचे नाव घेतले जाईल दि. 28 पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे व दिनांक 1 मार्च रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
   ( मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!