जामखेड नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार – रविकांत तुपकर

0
289

जामखेड प्रतिनिधी

  जामखेड नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असून जनतेच्या अपेक्षेप्रमाणे निश्चितच परिवर्तन घडवून नगरपरिषदेवर स्वाभिमानीचा झेंडा पळविला जाईल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
       शिवजयंतीनिमित्त शंभुराजे कुस्ती संकुल मंगेश (दादा) आजबे यांच्यातर्फे भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे  हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. हे हगाम्याचे तिसरे वर्ष आहे. या हगाम्याचे उदघाटन रविकांत तुपकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी मंगेश आजबे, शरद कार्ले, जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषिकेश डुचे यांच्या सह परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
    जामखेड न्युजशी बोलताना तुपकर म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेत जनतेला परिवर्तन हवे आहे आणी ते स्वाभिमानी शेतकरी संघटना नगरपरिषदेच्या सर्वच्या सर्व जागा लढवून स्वबळावर सत्ता मिळवून नगरपरिषदेवर स्वाभिमानीचा झेंडा फडकविणार आहोत असा विश्वास व्यक्त केला. तसेच शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकारचे शेतकरी कायदे हे आदाणी व आंबाणीच्या फायद्याचे आहेत. यात त्यांचाच फायदा होणार आहे. शेतकरी व ग्राहक हा भरडला जाणार आहे तो
 देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे.
     मोदी सरकारने आगोदर पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे. नाहीतर अपंग व्यक्तीला पळण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास लावण्यासारखे आहे. मोदी सरकारचा हमीभाव हा फक्त कागदावरच आहे त्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे.
     राज्यस्तरीय कुस्ती हगाम्याचे हे तिसरे वर्ष असून राज्यभरातील मल्ल या हगाम्यासाठी हजेरी लावतात व मोठ मोठे इनाम जिंकतात दिवसेंदिवस हगाम्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here