जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छ माझं घर सुंदर माझं अंगण स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असुन सुनंदाताई पवार यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यानंतर क्रमांक आलेल्या घरांची पाहणी करण्यात आली. जामखेड शहराला भारतात नंबर एक आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) यांचे सुनंदाताई पवार यांनी कौतुक केले.


आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाच शहरात जामखेडचा नंबर आणण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. यासाठी महिला, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचे सहकार्य घेतले जात आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक स्वच्छ माझं घर स्वच्छ माझं अंगण या स्पर्धेचे आयोजन केले होते. याचे बक्षिस वितरण आज सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ते क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक – वैशाली विठ्ठल वराट यांना पाच हजार रुपये रोख बक्षीस, द्वितीय क्रमांक – कोमल राजेंद्र कोल्हे यांना तीन हजार रुपये, तृतीय क्रमांक सायली विनीत पंडित दोन हजार रुपये तर उत्तेजनार्थ बालुश्री केशव मस्के यांनी क्रमांक पटकावले. स्वच्छ व सुंदर तसेच हरित जामखेड साठी नगरपरिषदेस 500 वड व पिंपळाची झाडे दिली आहेत तसेच कचरा संकलनासाठी मोठ्या प्रमाणावर डस्टबीनचे वाटप केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छ माझं घर स्वच्छ माझं अंगण या स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धा दहा दिवसाची होती सहभागी महिलेने ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून रोज घंटागाडीत टाकणे, आपले घर अंगण व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, टाकाऊ मधुन टिकाऊ असा उपक्रम राबवणे , स्वच्छतेविषयी नविन संकल्पना राबवणे, सर्व सहभागी घरांच्या स्वच्छतेचे व्हिडिओ चित्रीकरण आले होते.
या सर्वांचा विचार करून विजेते निवडण्यात आले होते.
सर्व सहभागी घरांना एक झाड, डस्टबीन व घड्याळ देण्यात आले.
सर्व विजेत्यांना सुनंदाताई पवार यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यानंतर सुनंदाताई, रमेश आजबे यांनी विजेत्या घरांची पाहणी केली विजेत्यांचे कौतुक केले स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना झाडांचे वाटप करण्यात आले. सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड रमेश आजबे करत असलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले.