जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राहुल कन्स्ट्रक्शन आयोजित क्रांती गृप मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके व कोरोना वाॅरियर्सचा सन्मान सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवप्रतिमेचे पुजन झाल्यावर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सुरू आसताना पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजत आमदार रोहित पवार यांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक पाहिले व कोरोना वाॅरियर्सचा सन्मान करून भाषणही केले यावेळी उपस्थितांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची आठवण झाली. आजोबाप्रमाणे रोहित पवार यांनीही पावसात भिजत भाषण केले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, शिवसेना तालुकाउपप्रमुख संजय काशीद, मनसे नेते दादासाहेब सरनोबत, प्रदिप टापरे, वैभव जामकावळे, विकास राळेभात, सनी सदाफुले, बापुसाहेब कार्ले, पांडुरंग भोसले, खंडागळे नाना, मयुर भोसले, कुंडल राळेभात, संभाजी वटाणे यांच्या सह अनेक शिवप्रेमी हजर होते.

कार्यक्रम सुरू आसताना पावसाला सुरुवात झाली पावसातच आमदार रोहित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली ते म्हणाले की, आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता. दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असताना शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भर पवसात एका सभेला संबोधित केले होते. त्या सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती झाली होती. तसेच साताऱ्यातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उदयनराजेंचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. तसेच विधानसभेतही राष्ट्रवादील ५४ जागा मिळाल्या होत्या. अखेर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते.
उपस्थित सर्व लोकांना शरद पवार यांची आठवण आली व आजोबाप्रमाणे नातवानेही पावसात भिजत केले भाषण व शिवजयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. आजोबांचा ख राजकीय वारसा रोहित पवार चालवणार अशी लोकांमधे चर्चा होती.