जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त योद्धा गृप
व स्वर्गीय योगेश राळेभात व स्वर्गीय राकेश राळेभात मित्र मंडळाच्या वतीने शहरातील श्रीकृष्ण नगर येथील कृष्ण मंदिरात 19 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे मानले जाते. सध्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. रक्तदानामुळे कोणाचातरी जीव वाचेल हीच गरज लक्षात घेऊन शहरातील श्रीकृष्ण नगर मोरे वस्ती येथील योध्दा गृपने शिवजयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या वेळी आमदार रोहित पवार, प्रा मधुकर राळेभात, सभापती सुर्यकांत मोरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, पोपटनाना राळेभात, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, नगरसेवक डीगंबर चव्हाण, पवन राळेभात, ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ भरत दारकुंडे, अभिजीत राळेभात, काकासाहेब राळेभात, महेश राळेभात, पांडुराजे भोसले, मयुर भोसले सर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरात एकुण ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विषेश म्हणजे रक्तदान करणार्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योध्दा ग्रृप चे आयोजक उमेश राळेभात, कृष्णा राळेभात, अमोल राळेभात, सागर गायकवाड, आकाश घागरे, प्रविण कसाब, अनिकेत मोरे, बंटी पाटील, घनश्याम राळेभात, गैरव राळेभात, सागर घुमरे, महेश मोरे, सागर मोरे, प्रशांत घागरे, स्वराज राळेभात यांनी खास परीश्रम घेतले. या कार्यक्रमास अहमदनगर ब्लड बँक व विकास जरे विशेष सहकार्य लाभले.