Sunday, June 7, 2026
Home ताज्या बातम्या बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला दोघांविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, आरोपी मौलानाला...

बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला दोघांविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, आरोपी मौलानाला अटक

0
7

जामखेड न्युज – – – – – 

बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, दोघांविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, आरोपी मौलानाला अटक

जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे एका १० वर्षीय अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने मशिदीत ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी तत्परता दाखवत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी मौलानाला तातडीने अटक केली आहे.

याबाबत गणेश सुभाष नलवडे (वय ३५, रा. घोडेगाव, ता. जामखेड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवार दिनांक ३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा १० वर्षांचा मुलगा केशव गणेश नलवडे हा गावातील हनुमान मंदिरात हरिपाठासाठी गेला होता. दरम्यान, मशिदीतून बाहेर आलेल्या एका मौलानाने बालकाचा उजवा हात पकडला आणि ‘चल मस्जिद में’ असे म्हणून त्याला बळजबरीने मशिदीच्या दिशेने ओढत नेण्यास सुरुवात केली.

घाबरलेल्या केशवने थोडे अंतर गेल्यावर स्वतःच्या हाताला जोरदार हिसका दिला आणि आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत थेट घर गाठले. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दिनांक ४ जून२०२६) सकाळी ८ वाजता केशवने कुटुंबियांना व गावातील लोकांना सांगितला.

त्यानंतर केशवचे वडील गणेश नलवडे आणि गावातील ग्रामस्थ मंदिराजवळ एकत्र आले व त्यांनी संबंधित मौलानाला या कृत्याबाबत जाब विचारला. सुरुवातीला त्या मौलानाने “तो मी नव्हतो” असे म्हणत कानावर हात ठेवले; मात्र बालक केशवने सर्वांसमोर त्याला अचूक ओळखले. ग्रामस्थांनी अधिक चौकशी केली असता “हाताला धरुन ओढणारा माणुस हाच आहे” असे केशवने सर्वांसमोर सांगितले.

मौलानाचे नाव विचारल्यावर तो मोहम्मद रिजवान मुजबिर रहमान, रा. वार्ड नं.१२, बनभाग, पोस्ट अमौर, ता. अमौर, जि. पुर्णिया, राज्य-बिहार, असे सांगीतले. त्यानंतर जुनैद इक्बाल सय्यदने “विनाकारण उगाचच कोणाचे कसे नाव घेता. तुम्हाला काय करायचे ते कुन घ्या” अशी धमकी दिली. गावात वाद वाढू नये याकरिता ग्रामस्थांनी खर्डा पोलीस स्टेशनला धाव घेतली.

सदर प्रकरणी 1) मोहम्मद रिजवान मुजबिर रहमान रा. वार्ड नं. 12 बनभाग पोस्ट अमौर ता. अमौर जि. पुर्णिया राज्य- बिहार 2) जुनैद इक्बाल सय्यद रा. घोडेगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर याचे विरुध्द भारतीय दंड संहिता (BNS) कलम ११५ (बालकावर शारीरिक व मानसिक अत्याचार), कलम ११६ (बालकाचा अपहरण/ओढणे), कलम ३५१ (धमकी देणे) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मौलानाला तातडीने अटक केली आहे. पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!