Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये ‘न्यूजपेपर फूड’चा कॅन्सर! वर्तमानपत्रात गुंडाळून मिळताहेत वडापाव-भजी, आरोग्य धोक्यात; अन्न...

जामखेडमध्ये ‘न्यूजपेपर फूड’चा कॅन्सर! वर्तमानपत्रात गुंडाळून मिळताहेत वडापाव-भजी, आरोग्य धोक्यात; अन्न व औषध प्रशासन झोपेत

0
3

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये ‘न्यूजपेपर फूड’चा कॅन्सर!

वर्तमानपत्रात गुंडाळून मिळताहेत वडापाव-भजी, आरोग्य धोक्या, अन्न व औषध प्रशासन झोपेतच 

“गरमागरम भजी घ्या, कुरकुरीत वडापाव…” पण तो कशात दिला जातोय? कालच्या बातम्यांच्या कागदात! जामखेड शहर व तालुक्यातील हॉटेल, टपऱ्या व हातगाड्यांवर सर्रास वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ दिले जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र अहिल्यानगरचे अन्न व औषध प्रशासन (FDA) मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नेमका धोका काय?
1. शाईचे विष: वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाई लेड, कॅडमियम, ग्राफाइट यांसारख्या घातक रसायनांनी बनलेली असते. गरम तेलकट पदार्थांचा संपर्क येताच ही शाई वितळून अन्नात मिसळते.

2. FSSAI ने घातली बंदी: भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने 2016 मध्येच वर्तमानपत्रात अन्नपदार्थ गुंडाळण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. हा कायदेशीर गुन्हा आहे.

3. कॅन्सरचा धोका: FSSAI च्या अहवालानुसार न्यूजपेपरच्या शाईमुळे पचनसंस्थेचे आजार, किडनी फेल, लिव्हर डॅमेज व कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

4. अस्वच्छता: रस्त्यावर पडलेले, धुळीने माखलेले, अनेकांच्या हाताळणीतून गेलेले पेपर थेट तोंडात जाणाऱ्या अन्नासाठी वापरणे म्हणजे रोगांना आमंत्रण.

जामखेडची परिस्थिती:
शहरातील बसस्थानक परिसर, खर्डा रोड, बीड रोड, नगर रोड, बीड रोड, आठवडे बाजार येथील ८०% पेक्षा जास्त वडापाव, भजी, भेळ, समोसा विक्रेते ग्राहकांना थेट पेपरमध्येच पदार्थ देतात. शाळकरी मुले, कामगार, महिला हे विष रोज खात आहेत.

FDA चे अधिकारी कुठे आहेत?
नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून दंडात्मक कारवाई करणे बंधनकारक आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी 2 लाखांपर्यंत दंड व परवाना रद्द होऊ शकतो.

मात्र जामखेडमध्ये गेल्या 2 वर्षांत एकही कारवाई झालेली नाही. “अधिकारी फक्त अहिल्यानगरच्या AC केबिनमध्ये बसतात, तालुक्यात कधी येतच नाहीत” अशी नागरिकांची तक्रार आहे.

नागरिक संतप्त:
“आमच्या मुलांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. FDA झोपले आहे का?” असा सवाल जामखेड येथील नागरिकांनी जामखेड न्युजशी बोलताना केला आहे.

काय करावे?
1. ग्राहकांनी नकार द्या: “पेपरमध्ये नको, प्लेटमध्ये द्या” असे ठामपणे सांगा.
2. विक्रेत्यांनो बदला: फूड ग्रेड बटर पेपर, ॲल्युमिनियम फॉइल, केळीचे पान, द्रोण वापरा. तुमच्या हातून कोणाला कॅन्सर होणार नाही याची काळजी घ्या.
3. तक्रार करा: FDA टोल फ्री क्रमांक 1800-222-365 किंवा fssai.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवा.

प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, नाहीतर जामखेडकरांच्या आरोग्याचा ‘काळा कागद’ FDA च्या निष्क्रियतेमुळे आणखी काळा होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!