Sunday, June 7, 2026
Home ताज्या बातम्या संभाजी ढोले यांनी ऑक्सिजनयुक्त देशी वृक्षांची लागवड करून केला वाढदिवस साजरा.

संभाजी ढोले यांनी ऑक्सिजनयुक्त देशी वृक्षांची लागवड करून केला वाढदिवस साजरा.

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

संभाजी ढोले यांनी ऑक्सिजनयुक्त देशी वृक्षांची लागवड करून केला वाढदिवस साजरा.

जामखेड पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक संभाजी ढोले यांनी आपला वाढदिवस पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तपनेश्वर महादेव मंदिर परिसरात देशी व ऑक्सिजनयुक्त वृक्षांचे रोपण करून साजरा केला. यावेळी वड, पिंपळ, जांभूळ, आपटा, चिंच आदी पर्यावरणपूरक व दीर्घायुषी ४० वृक्षांची लागवड करण्यात आली.

वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः वड व पिंपळ यांसारखी ऑक्सिजनयुक्त झाडे पर्यावरण संतुलन राखण्यास, शुद्ध हवा निर्माण करण्यास आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

या उद्देशाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी जामखेड नगर परिषदेचे बांधकाम सभापती मोहन पवार, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती अर्जुनदादा म्हेत्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट,नगरसेवक पवन राळेभात, युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल उगले, गोरोबा पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, इंजिनिअर दिगांबर फुटाणे,

सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, संदीप गायकवाड, बाबा चंदन, सुनील जगताप, उमेश माळवदकर, विकास मोराळे भाऊसाहेब, लखन राळेभात, अशोक पोटफोडे, सचिन देशमुख, सुरज पवार,मोहन डाडर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवसासारखे आनंदाचे क्षण वृक्षारोपणाद्वारे साजरे करण्याची गरज व्यक्त केली. तसेच लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या उपक्रमामुळे तपनेश्वर महादेव मंदिर परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून समाजात पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!