Home क्राईम न्यूज हद्दपारी आदेशाचा भंग करून जामखेड शहरात राहणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद ...

हद्दपारी आदेशाचा भंग करून जामखेड शहरात राहणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
5

जामखेड न्युज – – – – – 

हद्दपारी आदेशाचा भंग करून जामखेड शहरात राहणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेले ०२ इसम जामखेड शहरात असल्याची गुप्त माहिती मिळताच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन्ही सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.

दिनांक ०६/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हयातील हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा जामखेड शहरामध्ये शोध घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत हद्दपार इसम१) सोनु कुंदन वाघमारे, २) विक्रम भगवान डाडर हे हद्दपार आदेशाचा भंग करुन विना परवाना जामखेड शहरात आरोळेवस्ती येथील शेतामध्ये बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली.

सदर माहितीचे आधारे पथकाने बातमीतील इसमांचे आरोळेवस्ती जामखेड येथे शोध घेता दोन इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्यांचे नांव १) सोनु कुंदन वाघमारे वय – ३४ वर्षे, २) विक्रम भगवान डाडर वय – ३७ वर्षे दोघे रा. आरोळेवस्ती जामखेड, ता. जामखेड असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील इसमाचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्यांना दिनांक १३/०२/२०२५ पासुन ०१ वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यामधुन हद्दपार केलेले आहे अशी माहिती मिळाली.

ताब्यातील इसमाविरुध्द पो. कॉ. सुनिल रमेश मालणकर नेम स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जामखडे पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहेत.

हद्दपार गुन्हेगारांची माहिती कळवा

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हद्दपार केलेले इसम विना परवाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसुन आल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर ०२४१ – २४१६१११, डायल ११२ यावर कळविणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!