यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री साकेश्वर विद्यालयातर्फे घरी जाऊन सन्मान
आकाश दरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
श्री साकेश्वर विद्यालयातील गुणी व मेहणती माजी विद्यार्थी आकाश दरे हे २०१७ मध्ये स्पेशल फोर्स कमांडो नवी मुंबई येथे पोलीस दलात भरती झाले होते. खडतर कमांडो प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केले, अंगी जिद्द चिकाटी असल्यामुळे नुकततीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली याचा विद्यालयास सार्थ अभिमान आहे. यामुळे आज आकाशच्या घरी जाऊन विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने, ज्येष्ठ पालक ज्ञानदेव मुरूमकर, ज्येष्ठ शिक्षक सुदाम वराट, महेश दरे तसेच आकाशचे कुटुंबिय उपस्थित होते.
आकाशचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर पाचवी ते दहावी श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शिक्षण झाले. अकरावी बारावी सायन्स ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेज यानंतर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई येथे पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
आकाश दरे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक रोल मॉडेल म्हणून आहेत. अंगी जिद्द चिकाटी असेल तर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. हेच दाखवून दिले आहे.
आकाश दरे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र विदर्भ अकोला येथे महाराष्ट्र पोलीसचे 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण पुर्ण, तसेच NSG च्या धर्तीवर इस्रायल टॅक्टिस कमांडो ट्रेनिंग srpf गट 1 पुणे येथे 2 महिन्याचे खडतर कमांडो प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले.
कमांडो हिट compitition मध्ये All over best 2023 फोर्स वन गोरेगाव मुंबई येथे झालेल्या कॉम्पिटीशन मध्ये टॉप आले होते.
महाराष्ट्र पोलीस 10 किमी फिट इंडिया सायकलिंग स्पर्धा अवघ्या 21 मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला.. अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती आता पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.