Home क्राईम न्यूज कांद्याच्या शेतात अफूची शेती, दोघांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

कांद्याच्या शेतात अफूची शेती, दोघांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
5

जामखेड न्युज ——

कांद्याच्या शेतात अफूची शेती, दोघांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यातील बांधखडक शिवारात कांद्याच्या शेतात अफूची शेती केल्याचा मामला उघडकीस आला आहे. खर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ६ लाख १७ हजार ७२५ रुपये किमतीची २२ किलो ५६१ ग्रॅम अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात सुधाकर एकनाथ वारे आणि मारुती विश्वनाथ वारे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बांधखडक शिवारात अफूची शेती केली जात आहे. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वारे यांच्या शेतात धाड टाकली आणि अफूची झाडे जप्त केली.

या प्रकरणात खर्डा पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) आणि १८ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अशी आणखी अफूची शेती उघडकीस येणार का? अफूची शेती करणाऱ्यांवर काय कारवाई होणार कर्जत तालुक्यातील चापडगाव या ठिकाणी पोलीसांनी अफूच्या शेतीवर कारवाई करण्याची घटना ताजी असतानाच जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला प्रतिबंधित अफूची मोठी लागवड उघडकीस आली. खर्डा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ६ लाख १७ हजार रुपये किमतीची अफुची झाडे जप्तकेली आहेत. या प्रकरणी दोन जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील बांधखडक या ठिकाणी सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांनी शेत गट क्र. १९१ व १९२ मधून २२ किलो प्रतीबंधीत आसलेल्या अफूच्या झाडांची लागवड केली होती. ही माहिती खर्डा पोलांना समजली. यानंतर खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि उज्वलसिंग राजपूत यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अंमलीपदार्थ विरोधी पथक गुप्त बातमीदाराच्या सूचनेवरून प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी वाहनांमधील पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी शेतात कांद्याच्या पिकाच्या आडोशाने अफुची जोपासना केली आसल्याचे निदर्शनास आले.

आरोपींनी गेल्या ३-४ महीन्यांपासुन या झाडांना खते आणि पाणी देऊन त्याचे संवर्धन केले असल्याची कबुली दिली. या छाप्यात सुमारे ६ लाख १७ हजार७२५ रुपये कीमतीची २२ किलो ५६१ ग्रॅम अफुची झाडे जप्त केली. या प्रकरणी पोलीस हवालदार संदिप धामणे यांच्या फिर्यादीवरून बांधखडक येथिल सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेंसिक टीम कर्जत विभागाने घटनास्थळी पुरावे गोळा केले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपरपोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीयअधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालीसपोनि उज्वलसिंग राजपूत, संभाजी शेंडे, संदीपधामणे, गोकुळ इंगवले, प्रविण थोरात, विष्णु आवारे,धनराज बिराजदार, शाम चखाले, बाळू खाडे, अशोकबडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख, चालक शकिल बेग,संजय गुंड यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपाससपोनि उज्वलसिंग राजपूत करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!