जामखेड च्या नेत्यांचे राज्यात वजन मात्र शहरातील नागरिकांसाठी दुषित व गढूळ पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात “स्वच्छ पाणी द्या, अन्यथा आंदोलन” – शहाजी राळेभात यांचा नगरपरिषदेला इशारा
जामखेड च्या नेत्यांचे राज्यात वजन मात्र शहरातील नागरिकांसाठी दुषित व गढूळ पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
“स्वच्छ पाणी द्या, अन्यथा आंदोलन” – शहाजी राळेभात यांचा नगरपरिषदेला इशारा
विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांचे राज्यात मोठे वजन आहे. राज्यातील अनेक प्रश्न लावून धरतात व मार्गी लावतात. मात्र त्यांचा जामखेड शहरातील नागरिकांना पिण्यासाठी नळाद्वारे दुषित पाणी मिळत आहे. तेही आठ दिवसांतून एकदा शहरासाठी उजणी धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना दोन वर्षापासून ऐंशी टक्के काम होऊनही निधीअभावी बाकी काम रखडलेले आहे. जामखेड शहरात सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे तेही गढूळ व दुषित यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकेकाळी चोवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून ओळख असलेल्या जामखेड शहरात सध्या पाणीबाणी सुरू आहे. नळाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. तेव्हा राज्यात वजन असणाऱ्या दोन्ही नेत्यांनी जामखेड च्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.
जामखेड शहरातील सर्व भागात दुषित पाणी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी पाण्याच्या टाकीत शेवाळ व दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले.
जर नगरपरिषदेने शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर पुढील काळात जामखेड तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे.बुधवार दिनांक 11 मार्च रोजी तपनेश्वर भागात नळाचे पाणी सुटले होते.
मात्र नळाद्वारे पिवळसर व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ही बाब नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पदाधिकारी व नगरसेवक पाणीपुरवठा होत असलेल्या भुतवडा रोड येथील पाण्याच्या टाकीवर गेले त्यांनाही तेथुन होणारा पाणीपुरवठा दुषीत होत असल्याचे दिसून आले.
पुढे बोलताना शहाजी राळेभात म्हणाले की आम्ही प्रत्यक्ष पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीची व इतर ठिकाणी पहाणी केली. यावेळी पाण्याच्या टाकीची अस्वच्छता दिसुन आली. पाण्यात शेवाळ आढळुन आले आहे. त्यामुळे हे दुषीत पाणी नागरीकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणार आहे. मुख्याधिकारी यांनी या गोष्टीकडे गांभिर्याने पाहीले पाहीजे.
तसेच जर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले नाही तर लवकरच तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जेष्ठ नेते राजेंद्र कोठारी म्हणाले की पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी रजिस्टर रेकॉर्ड दिसुन आले नाही. मुख्याधिकारी यांनी या गोष्टीकडे गांभिर्याने पाहीले पाहीजे, नागरीकांना स्वच्छ पाणी देता येत नसेल तर मुख्याधिकारी यांनी आपली बदली करून घ्यावी असे देखील कोठारी म्हणाले. लवकरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडणार आहोत असे सांगितले.
जामखेड शहरातील नव्वद टक्के लोक हे पाणी पितात. या दुषीत पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली. आता नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी आंदोलनाचा इशारा नगरपरिषदेला दिला आहे. त्यामुळेच आता नगरपरिषद काय भुमिका घेते यावर पुढील कार्यवाही आवलंबुन आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, युवा नेते शहाजी (काका) राळेभात, संभाजी राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात माजिद कुरेशी, वसीम सय्यद, इस्माईलभाई सय्यद, संदिप गायकवाड, डॉ. कैलास हजारे, सागर सदाफुले, प्रवीण उगले, हरिभाऊ आजबे, सागर भोसले, सचिन शिंदे, दिपक घायतडक, दत्ता डिसले, स्वामी दिक्षित, नगरपरिषदेचे पाणीपुरवठा आभियंता ज्ञानेश्वर मिसाळ उपस्थित होते.
चौकट
नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायत काळातील अपुरा कर्मचारी वर्ग आहे. तरी देखील आम्ही नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सुचनांचे पालन करु तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जामखेड शहराला पाणीपुरवठा देण्यात येईल.