साकतमध्ये ७१ वर्षे अखंड वीणावादन निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवार दि १३ रोजी सुरू होत आहे. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच भागवत कथा, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सप्ताहाची सांगता शुक्रवार २० रोजी होणार आहे.
जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ७१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. १३ पासून सुरू होत आहे व शुक्रवार दि. २० रोजी सांगता होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनिक कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्रनाम, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी २.०० ते ५ पर्यंत भागवत कथा, ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन व नंतर गावजेवण व नंतर हरिजागर
सोमवार दि. १६ रोजी सायंकाळी १० ते १२ हभप विद्या दिदी मुरूमकर यांचे भारूड होईल
पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा होईल सायंकाळी ७ ते ९ दररोज शुक्रवार दि. १३ रोजी हभप प्रदिप महाराज ढेरे- वीट ता. करमाळा
शनिवार दि १४ रोजी हभप शिवचरित्रकार बालाजी महाराज बोरूडे परांडा
रविवार दि. १५ रोजी हभप वैराग्यमुर्ती गोविंद महाराज शिंदे – निमगाव डाकू
सोमवार दि. १६ रोजी हभप चैतन्य महाराज शास्त्री जुना गहिनीनाथ गड
मंगळवार दि. १७ रोजी भागवताचार्य नाना महाराज कदम नेकनूर
बुधवार दि. १८ रोजी हभप उत्तम महाराज वराट साकतकर
गुरूवार दि. १९ रोजी हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ
शुक्रवार दि २० रोजी सकाळी ९ ते १२ हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे काल्याचे किर्तन होईल. अशी माहिती संयोजक हभप भीमराव महाराज मुरूमकर व हभप बाबा महाराज मुरूमकर यांनी दिली.
या सप्ताहामध्ये गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप इंद्रजित महाराज येवले, नामदेव महाराज चव्हाण, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ, विष्णू महाराज म्हेत्रे व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, प्रमोद महाजन पदमुले, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे असतील. काकडा माऊली वीर, राम गुळवे, शिवाजी भोरे, मुरलीधर पाटील, विणेकरी उद्धव मुरूमकर
सप्ताहासाठी मंडप सौजन्य प्रा अरुण देवराव वराट, हरिदास विष्णू मुरूमकर, रोहित शिवाजी घोडेस्वार, युवराज आश्रू चव्हाण यांचे राहिल.
श्रीमत भागवत कथा यजमान अनिल वराट ( धारा ग्रुप इंदोर) व आत्माराम वराट अक्षय ट्रान्सपोर्ट अहमदाबाद
तसेच जाहिरात सौजन्य कै. ओम अशोक वराट यांच्या स्मरणार्थ अशोक कुंडलीक वराट असतील