ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेजचे प्रा. संजय समुद्र यांना पीएचडी प्रदान

0
375

जामखेड न्युज——

ल. ना. होशिंग ज्युनियर काॅलेजचे प्रा. संजय समुद्र यांना पीएचडी प्रदान

जामखेड येथील नामांकित अशा ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.
प्रा.संजय समुद्र यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना. होशिंग ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक संजय समुद्र यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या वाणिज्य विद्या शाखेतील पीएचडी प्रदान झाली.

प्रा. संजय समुद्र यांनी AN ANALYTICAL STUDY OF MANAGEMENT INFORMATION SYSTEM AND ITS APPLICATION IN BANK WITH SPECIAL REFERENCE MAHARASHTRA GRAMIN BANK (मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि विशेष संदर्भासह महाराष्ट्र ग्रामीण बँक बँकेत त्याचा वापर ) या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. डॉ. भारत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. याबद्दल पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरुण शेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, सह सर्व संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, साहेब, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक पी.टी गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here