पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट, फडणवीस गडचिरोलीचे तर अजित पवार पुण्यासह बीडचे, शिंदेकडे मुंबई-ठाणेचे पालकमंत्री

0
669

जामखेड न्युज——-

पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट, फडणवीस गडचिरोलीचे तर अजित पवार पुण्यासह बीडचे, शिंदेकडे मुंबई-ठाणेचे पालकमंत्री

 

राज्यातील नव्या सरकारमधील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी स्वतःकडं ठेवली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पुण्यासह सध्या चर्चेत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडं मुंबई शहरासह ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पालकमंत्रिपदावरून महायुतीतल्या तिन्ही मुख्य पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून आलं होतं. आपल्यालाच पालकमंत्रिपद मिळावं म्हणून शर्यत आणि त्यातून मग मतभेद असं नाट्यही पाहायला मिळालं.

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी (जिल्हानिहाय)
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
ठाणे – एकनाथ शिंदे
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
नाशिक – गिरीश महाजन
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – अशोक उईके
सातारा – शंभूराज देसाई
रायगड – आदिती तटकरे
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
भंडारा – संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशिव – प्रताप सरनाईक
बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग – नितेश राणे
अकोला – आकाश फुंडकर
गोंदिया – बाबासाहेब पाटील
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना बोर्डीकर
अशी सुरू होती रस्सीखेच
42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांनाच पालकमंत्री पद मिळाली आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, भरत गोगावले, योगेश कदम आणि ईतर मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद नाही.

पुण्याच्या पालकमंत्रिपदावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र, ते अजित पवारांकडं गेलं.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात रस्सीखेच होती. त्यात आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यात आलं
बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र दोघांचाही पत्ता कट होऊन अजित पवारांकडे बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार अशी चर्चा होती. त्यात छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद संजय शिरसाट यांना मिळालं आहे. तर सावे यांना नांदेडचं पालकमंत्रिपद देण्यात आलं.
मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत होती. कारण आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई शहराचे पालकमंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांना दिले गेले.
तर मुंबई उपनगराचे पालकमंत्रिपद हे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here