जामखेड बस डेपो झाला धक्का स्टार्ट, जुन्या व निकृष्ट गाड्यामुळे मध्येच पडतात बंद जामखेड डेपोला नव्या बस मिळाव्यात

0
630

जामखेड न्युज——–

जामखेड बस डेपो झाला धक्का स्टार्ट,
जुन्या व निकृष्ट गाड्यामुळे मध्येच पडतात बंद

जामखेड डेपोला नव्या बस मिळाव्यात

 

एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोंपैकी एक असलेल्या जामखेड डेपोला सध्या समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. कमी गाड्या, जुन्या गाड्या, नादुरुस्त गाड्या, दररोज अनेक ठिकाणी जामखेड डेपोच्या गाड्या बंद पडतात. अनेकांना बस ला धक्का देऊन चालू कराव्या लागतात यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जामखेड बस डेपो धक्का स्टार्ट झाला आहे असे प्रवाशी म्हणतात.

तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातील एसटी डेपोमध्ये एकेकाळी एकूण ७० बस होत्या आता ५५ बस आहेत पण यातील काही बस कामासाठी लावलेल्या असतात यामुळे कमी बसवर आगार व्यवस्थापकाला तारेवरची कसरत करत नियोजन करावे लागते. यातच लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक गाड्या बंद पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनेकांना लांबच्या प्रवासासाठी जायचे असते. आणि जर गाडी बंद पडली तर वेळेवर जाता येत नाही. तसेच अनेकांचे शासकीय कामे ठप्प होतात वेळेवर जाता येत नाही. तसेच महिला व मुलींना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. साकत येथे मुक्कामाला असलेली गाडी सकाळी चालूच होत नव्हती. ग्रामस्थ व प्रवासी यांनी तिला बराच लांब धक्का मारला तेव्हा कुठे ती बस सुरू झाली. यामुळे बराच वेळ गेला. काॅलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला बुडाला तसेच प्रवाशांचे हाल झाले. नागरिकांचे हाल रोजचीच घटना झाली आहे. यामुळे जामखेड बस डेपो म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा.

नादुरुस्त गाड्या मुळे अपघात होतात यात प्रामुख्याने चालकालाच जबाबदर धरले जाते; मात्र, डेपोतून बाहेर पडणाऱ्या गाडीची अवस्था ठीक नसेल तर चालकाचाही नाइलाज होतो. एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोपैकी जामखेड डेपो आहे. त्यामुळे याकडे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.


साकत येथे मुक्कामाला असलेली गाडी सकाळी चालूच होत नव्हती. ग्रामस्थ व प्रवासी यांनी तिला बराच लांब धक्का मारला तेव्हा कुठे ती बस सुरू झाली. यामुळे बराच वेळ गेला. काॅलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला बुडाला तसेच प्रवाशांचे हाल झाले. नागरिकांचे हाल रोजचीच घटना झाली आहे.

जामखेड येथील नवीन बसस्थानकाची पाहणी काल जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पाहणी केली. योग्य त्या सूचना दिल्या. जामखेड आगारासाठी नवीन बससाठी सभापती प्रा. राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून नवीन बस आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here