ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा संपन्न

0
126

जामखेड न्युज——

ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा संपन्न

आज गुरुवार दिनांक १२-१२-२०२४ रोजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी प्रचंड विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या निबंध स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब पारखे,अॅड.श्री अजय दादा काशीद,श्री अभिषेक सांगळे,श्री योगेश हुलगुंडे, उपमुख्याध्यापक श्री प्रवीण गायकवाड,पर्यवेक्षक श्री दत्तात्रय राजमाने,वरिष्ठ लिपिक श्री ईश्वर कोळी भाऊसाहेब,ज्येष्ठ शिक्षक श्री भरत लहाने,श्री बबन राठोड, कलाशिक्षक राऊत मुकुंद,श्री पोपट जगदाळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सुरुवातीला प्रास्ताविक श्री ऋषिकेश मोरे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन विषयाप्रमाणे आपले विचार लिहिता आले पाहिजेत.व बोलता आले पाहिजेत. यासाठी निबंध स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्पर्धेच्या युगामध्ये सतत वेगवेगळ्या स्पर्धा विद्यार्थ्यांनी दिल्या पाहिजेत.असे प्रास्ताविक मनोगत श्री ऋषिकेश मोरे यांनी केले.

त्यानंतर अँड. अजय काशीद यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सुप्त क्षमता आहेत. त्यांना संधी मिळण्याची आवश्यकता आहे ही संधी कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा श्री मोरे कुटुंबीय विद्यार्थ्यांसाठी गेल्या वीस वर्षापासून या ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये स्पर्धा घेत आहेत.श्री मोरे कुटुंबाने विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन करून मनोगत पूर्ण केले.

त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व्यायाम,वाचन व उत्तम विचारसरणी विद्यार्थी जीवनात महत्त्वाचा घटक आहे याचा अवलंब केल्यास व एक ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते व त्याचबरोबर निबंधातील विषय आजच्या काळामध्ये योग्य असून यावर विद्यार्थ्यांनी निबंधातून लिहिले पाहिजे प्रचंड विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून व त्यांना कै.सुरेश दिगंबरराव मोरे स्मृती प्रित्यर्थ निबंध स्पर्धा यातून ही संधी गेल्या वीस वर्षापासून उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने ऋषिकेश मोरे यांचे खूप खूप अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभाग व श्रीमती सुप्रिया घायतडक, श्रीमती पूजा भालेराव, श्रीमती रेश्मा कारंडे,समारंभ प्रमुख आदित्य देशमुख,श्री कैलास वराट,श्री रोहित घोडेस्वार, श्री नरेंद्र डहाळे, श्री बापू जरे,श्री साई भोसले,श्री हनुमंत वराट,श्री लक्ष्मण सोळंकी यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख श्री अनिल देडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भरत लहाने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here