डॉ. सुनील पुराणे यांची शालेय शिक्षण पाठ्यक्रम समितीच्या गणित विषयतज्ञ सदस्य पदी नियुक्ती
जामखेड महाविद्यालय जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय व विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणारे डॉ. सुनील पुराणे यांची महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागच्या ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या शालेय शिक्षण (इ. ३ री ते १० वी) अभ्यासक्रम/ पाठ्यक्रम समितीच्या विषयतज्ञ सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. जामखेड महाविद्यालय जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामखेड महाविद्यायातील प्रा. डॉ. सुनील गंगाराम पुराणे हे १९९१ पासून गणित विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महाविद्यालयात एन. एस. एस. अधिकारी, विद्यार्थी विकास अधिकारी तसेच नॅक समन्वयक म्हणून काम केले आहे.
ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे च्या गणित अभ्यास मंडळाचे सदस्य होते. नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये वावरणारे आणि विद्यार्थ्यांचे हित पाहणारे, महाविद्यालयात आपल्या सहकार्यांच्या मदतीने हिरवीगार झाडी जपणारे, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये व्याख्यानाच्या माध्यमातून गणितात गोडी निर्माण करणारे प्रा. म्हणून त्यांची ओळख आहे.
डॉ. पुराणे यांचे वीस पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित केलेले आणि दोन विद्यार्थ्याचे पी. एचडी.चे मार्गदर्शक नुकतेच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागच्या ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT)’ शालेय शिक्षण (इ. ३ री ते १० वी) अभ्यासक्रम/ पाठ्यक्रम समितीच्या विषय तज्ञ सदस्य पदी नियुक्ती झाली त्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकारी व महाविद्यालयातील प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
याबद्दल दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव (बापू ) देशमुख, उपाध्यक्ष अरूण शेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे यांच्या सह सर्व संचालक मंडळ तसेच जामखेड महाविद्यालय जामखेड चे प्राचार्य एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके यांच्या सह सर्व प्राध्यापक, मित्र मंडळी व नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.