कै. देवराव दिगंबर वराट फार्मसी काॅलेजच्या विद्यार्थ्यांची रूग्णालय व औद्योगिक क्षेत्राला भेट विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवावर आधारित ज्ञान

0
833

जामखेड न्युज——

कै. देवराव दिगंबर वराट फार्मसी काॅलेजच्या विद्यार्थ्यांची रूग्णालय व औद्योगिक क्षेत्राला भेट

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवावर आधारित ज्ञान

 

जामखेड तालुक्यातील साकत येथील कै. देवराव दिगंबर वराट येथील फार्मसी काॅलेजच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्षात रुग्णालयात असलेल्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते याचा अनुभव व्हावा यासाठी मुंढे हाँस्पीटल व ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हाँस्पीटल तसेच औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा व पाणी फिल्टर कसे होते या क्षेत्राला भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली.

विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये फार्मासिस्ट म्हणून रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात रुग्णालयात असलेल्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते याचा अनुभव व्हावा म्हणून साकत येथील कै. देवराव दिगंबर वराट येथील फार्मसी काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी जामखेड येथील मुंढे हाँस्पीटलला भेट देत येथील कामकाज आसीयु विभाग, एक्सरे विभाग, ओपीडी विभाग, इसीजी यंत्रणा तसेच मेडिकल विभागातील कामकाज कसे चालते तसेच आधुनिक आरोग्य सेवा प्रणालीची जवळून ओळख झाली. या विषयी माहिती जाणून घेतली.

हाँस्पीटलमधील कामकाजाची वेगवेगळ्या विभागांची माहिती जाणून घेत जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या मध्ये पाणी फिल्टर प्रक्रिया कशी चालते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

आज कै. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत मधील विद्यार्थ्यांची मुंढे hospital ला visit दिली. तेथे डॉ. एकनाथ मुंढे यांनी हाँस्पीटल मधील सर्व विभागाची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. एकनाथ मुंढे व भाऊसाहेब सानप सर व त्यांच्या टीम ने ICU word , X-ray Technique, OPD, Operation Theater, ECG technique, Diagnostic Ultrasound Technique, Angiography technique, CT scan, MRI scan, Accident and Emergency care, and medical विषयी सर्व माहिती दिली.

आणि ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हाँस्पीटल येथे डॉ. प्रशांत खंडागळे, आरती घोरपडे व आशिष पठाण यांनी देखील hospital विषयी माहिती देऊन मुलांच्या ज्ञानात लाख मोलाची भर घातली. व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.


त्यानंतर कॉलेज चे प्राचार्य बारगजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर purification plant भुतावडा road Jamkhed येथे भेट दिली असता तेथे वॉटर filtration and water conservation बद्दल माहिती दिली. त्या वेळेस कॉलेज मधील प्रा. माने सर प्रा. सानप सर. प्रा. बडे मॅडम व कृष्णा पुलवळे, अशोक नेमाने हे देखील उपस्थित होते.

फार्मसी काॅलेजच्या विद्यार्थ्यांची रूग्णालय व औद्योगिक क्षेत्राला भेट दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सर आणि संस्थेचे सचिव श्री. कैलास वराट सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभवावर आधारित ज्ञान दिले. निश्चितच विद्यार्थ्यांना भविष्यात याचा उपयोग होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here