जामखेड न्युज——
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार संपन्न
सहकार महर्षी स्वर्गीय जगन्नाथ राळेभात यांचा शेतकरी हिताचा वारसा जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी पुढे चालवला आहे. असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी व्यक्त केले.
जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी उपसभापती कैलास वराट बोलत होते यावेळी माजी सभापती सुधीर राळेभात, संचालक नारायण जायभाय, सतिश शिंदे, विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, माजी संचालक करण ढवळे यांच्या सह अनेक मान्यवर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, व्यापारी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी अमोल राळेभात विषयी बोलताना कैलास वराट म्हणाले की, जिल्ह्यात सहकार क्षेत्रात आपला दबदबा कायम आहे. जिल्हा बँक चेअरमन निवड प्रक्रियेत आपण आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. तसेच एकरी पस्तीस हजार रुपये कर्ज पुरवठा केल्याने दक्षिण भागातील जामखेड तालुक्यातील जिरायती शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. वाढिव कर्ज मिळत आहे.
नगर जिल्हा साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण आपण जिरायती शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असे निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. आपल्या दूरदृष्टी नेतृत्वाने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माझ्या सारख्या सर्वसामान्य शिक्षकाला संधी दिली. अमोल राळेभात म्हणजे जनाधार असलेले नेतृत्व आहे.
अमोल राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.