जामखेड न्युज——-
जामखेडमध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण उत्साहात सुरू
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड मध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण पहिला टप्पा दि. १२ डिसेंबर रोजी ल. ना. होशिंग विद्यालयात मोठ्या उत्साहात सुरू झाले.
बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ल. नि. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात सुरू झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य बाळासाहेब पारखे, पर्यवेक्षक प्रविण गायकवाड,शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सुरेश मोहिते, केशवराव गायकवाड, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, केंद्रप्रमुख विक्रम बडे यांच्या सह इतर मान्यवर व शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी यांनी प्रशिक्षणार्थी यांना खुप छान
मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या
सूत्रसंचालन मारुती गीते यांनी केले तसेच या प्रशिक्षणाचा उद्देश आणि महत्व विषय साधन व्यक्ती तागड सर यांनी सर्वांना सांगितले त्याचबरोबर शिंदे प्रवीण सर यांनी सर्वांचे आभार मानले.
मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न करून सर्वांना आपापल्या कुलांमध्ये बसण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
या प्रशिक्षणामध्ये दोन वेळेला चहा व एक वेळचे जेवण देण्यात येते.