जामखेड न्युज——
शेतकरी ग्रामविकास आघाडीचे सर्वसमावेशक व मतदारांच्या मनातील उमेदवार
शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणारी जवळा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये शेतकरी ग्रामविकास आघाडीचे १ ते ५ मध्ये एकुण १५ उमेदवार तर सरपंच पदासाठी बाळासाहेब श्रावण आव्हाड आसे एकुण १६ तगडे व जनतेच्या मनातील उमेदवार दिले आहेत यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचे पारडे जड आहे.
लोकनेते स्व. श्रीरंगभाऊ कोल्हे, स्व किसनराव दळवी व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा व विकासाचे स्वप्न घेऊन गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून या पॅनेलने तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब श्रावण आव्हाड असुन त्यांचे चिन्ह (कपबशी) आहे. तर वार्ड क्रमांक १ मधुन नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्ग मधुन पांडुरंग उद्घाव शिंदे, चिन्ह (छताचा पंखा), सर्वसाधारण प्रदिप किसनराव दळवी, चिन्ह (बादली) सर्व साधारण स्त्री मधुन सौ.दिक्षा सुरज कांबळे, चिन्ह (फुटबॉल)
वार्ड क्रमांक २ चे अधिकृत उमेदवारांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, संतराम अदिनाथ सुळ, चिन्ह (बादली), अनुसूचित जाती स्त्री मधुन सौ. रुपाली राहुल लोंढे चिन्ह , (फुटबॉल) सर्व साधारण स्त्री मधुन सौ. रोहिणी दत्तात्रय वाळुंजकर, चिन्ह (छताचा पंखा)
वार्ड क्रमांक ३ मधुन अनुसूचित जाती पुरुष किसन दत्तात्रय सरोदे, चिन्ह (बादली), सर्वसाधारण मधुन प्रशांत भाऊसाहेब पवार, चिन्ह (फुटबॉल), नागरीकांचा मागास प्रवर्ग मधुन सौ.सिताबाई रामभाऊ पठाडे, चिन्ह (छताचा पंखा)
वार्ड क्रमांक ४ चे अधिकृत उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मधुन दशरथ येदू हजारे, चिन्ह (फुटबॉल), नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री मध्ये सौ.पुजा उमेश रोडे चिन्ह, (बादली), सर्वसाधारण स्त्री मधुन सौ. सोनाली गौतम कोल्हे, चिन्ह (छताचा पंखा)
वार्ड क्रमांक ५ मधुन सर्वसाधारण मधुन नय्युम असलम शेख, चिन्ह (फुटबॉल), सर्वसाधारण स्त्री मधुन सौ.ठकुबाई साधु हजारे, चिन्ह (छताचा पंखा), तर सर्वसाधारण स्त्री मधुन सौ.दैवशाला उमेश हजारे चिन्ह (बादली) आसे एकुण १५ तगडे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदासाठी अधिकृत तगडे उमेदवार बाळासाहेब श्रावण आव्हाड हे उभे राहिले आसुन त्यांचे चिन्ह (कपबशी) आहे.
जनतेच्या मनातील व सर्वसमावेशक उमेदवार दिल्याने जवळा शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे.



