जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील गावात लागले पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक
मराठा आरक्षणासाठी गावकरी आक्रमक
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु आहे. तसेच आज मोदींच्या सभेकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली गाड्या रिकाम्या परत लावल्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेली मुदत संपत आली आहे. राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्यानंतर आता जरांगे पाटील परत उपोषणाला सुरूवात केली आहे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु आहे. तसेच आज मोदींच्या सभेकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली गाड्या रिकाम्या परत लावल्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणासाठी उग्र आंदोलन सुरू झाले आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसे फलक गावोगावी लागले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमास शासनाच्या वतीने मोफत बस असतानाही नागरिकांनी याकडे पाठ फिरवली व बस रिकाम्याच माघारी गेल्या.
जामखेड तालुक्यात आरक्षणासाठी वातावरण तप्त होऊ लागले आहे. साखळी उपोषण सुरु आहे. आणि आता प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.