जामखेड न्युज——
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून प्रभाग अठरा साठी कोट्यावधी रुपयांचा निधी

शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या कडे प्रभाग अठरा मध्ये विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती. याच अनुषंगाने आमदार प्रा. राम शिंदे यांनी नागेश्वर मंदिर पुल रस्ता बांधकाम करणे, सुशोभीकरण करणे, दशक्रिया घाट बांधणे या कामासाठी 3 कोटी रूपयांचा निधी, मल्लिकार्जुन मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 25 लाख रूपये, राम मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 40 लाख रूपये व लोहारदेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 50 लाख रूपये निधी मंजूर केला आहे यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी प्रभाग अठरा च्या वतीने आमदार प्रा राम शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी मिळावा यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जामखेड नगरपरिषदेतील विविध विकास कामांना राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला आहे.ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड शहरवासियांसाठी 5 कोटी रूपयांच्या निधीचे मोठे गिफ्ट दिल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामखेड नगरपरिषद क्षेत्रात विविध विकासकामे मार्गी लागावी यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर केले होते. नगरपरिषदांना वैशिष्टय़पूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून सहा मोठ्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी सुमारे 5 कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील महत्वाची कामे मार्गी लागणार आहेत. नगर विकास विभागाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

आमदार प्रा.राम शिंदे हे विधानपरिषद सदस्य झाल्यापासून त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्याचा धडका लावला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मतदारसंघात आणला आहे. अजूनही अनेक विकास कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जामखेड नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सरकारने जामखेड नगरपरिषदेसाठी 5 कोटींचा निधी मंजुर केला आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड शहरासाठी मंजुर झालेल्या 5 कोटी निधीतून नागेश्वर मंदिर पुल रस्ता बांधकाम करणे, सुशोभीकरण करणे, दशक्रिया घाट बांधणे या कामासाठी 3 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. तसेच खंडोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामासाठी 35 लाख रूपये, मल्लिकार्जुन मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 25 लाख रूपये, राम मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 40 लाख रूपये, लोहारदेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी 50 लाख रूपये, तर शादीखाना व ईदगाह मैदान सुशोभीकरण करणे या कामासाठी 50 लाख रूपये असा निधी मंजुर करण्यात आला आहे.
जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरा समोरील नदीवर पुल बांधला जावा तसेच नदीघाट उभारावा ही गेल्या अनेक वर्षांची शहरातील नागरिकांची मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुढाकार घेत मार्गी लावली. यासाठी 3 कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर केला. आमदार प्रा राम शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे नागेश्वर भक्तांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रभाग अठरा साठी चार कोटी पंधरा लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे प्रभागाच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत.



