जामखेड न्युज——
जामखेडला अत्याधुनिक सोयी सुविधासह डॉ. धनश्री वराट यांच्या श्री साकेश्वर दाताच्या दवाखान्याचा उत्साहात शुभारंभ!!!
उच्च शिक्षित डॉ. धनश्री जालिंदर वराट यांच्या श्री साकेश्वर दाताचा दवाखाना याचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामुळे आता जामखेड परिसरातील नागरिकांना दाताच्या समस्या बाबत आधुनिक उपचार सुविधा डॉ धनश्री वराट यांच्या दवाखान्यात मिळणार आहे.
डॉ. धनश्री वराट यांच्या श्री साकेश्वर दाताचा दवाखाना उद्घाटन प्रसंगी डॉ. दुर्गप्रसाद हिवाळे, डॉ. सोनाली हिवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, माजी प्राचार्य व जिल्हा मराठा शैक्षणिक संस्थेचे सल्लागार डॉ. तुकाराम वराट, माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, सुरेश वराट, जालिंदर वराट, डॉ. सागर शिंदे, डॉ. निरंजन देशमुख, डॉ. अविनाश पवार, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. प्रविण मिसाळ, डॉ. राहुल लद्दड, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. तुषार बहिर, डॉ. सुनील वराट, डॉ. अजय वराट, डॉ. सचिन काकडे, डॉ. निखिल वारे, डॉ. संतोष सोनार, डॉ. कुंडलिक अवसरे, डॉ. राहुल कडूस सह जामखेड, जवळा, साकत परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. धनश्री वराट यांच्या श्री साकेश्वर दाताचा दवाखान्यात उपलब्ध सुविधा!!!
रूट कँनल ट्रिटमेंट, कँप/ ब्रिज बसवणे, दातासारखे सिमेंट भरणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, कवळी बसवणे, दात काढणे, लहान मुलांच्या दातावर उपचार, डिजिटल एक्स रे, दात साफ करणे या सह इतर उपचार करण्यात येणार आहेत.