Sunday, March 29, 2026
Home शैक्षणिक बातम्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी कठीण परिस्थिती आठवा – दिनकर टेमकर शास्ती...

जीवनातील ताण कमी करण्यासाठी कठीण परिस्थिती आठवा – दिनकर टेमकर शास्ती न लावता गोड बोलून चांगले काम होते.- पोपटराव काळे संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान सोहळा

0
263

जामखेड न्युज——

जीवनातील ताण कमी करण्यासाठी कठीण परिस्थिती आठवा – दिनकर टेमकर

शास्ती न लावता गोड बोलून चांगले काम होते.- पोपटराव काळे

संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान सोहळा

सध्या प्रत्येकाचे जीवन धावपळीचे व धकाधकीचे झाले आहे. प्रचंड स्पर्धा वाढली आहे. ताणतणाव वाढला आहे यामुळे जीवनशैली बदलली आहे. हा ताणतणाव कमी करण्यासाठी जीवनातील कठीण परिस्थिती आठवा म्हणजे जीवनातील ताणतणाव कमी होईल असे मत शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी व्यक्त केले.

जामखेड येथे जिव्हाळा फाऊंडेशनच्या पुढाकारातून झालेल्या संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पोपटराव काळे यांच्या काजवा, मनोहर इनामदार यांच्या गवसणी व गोकुळ गायकवाड यांच्या बोलती दोहे आणी गाथा या पुस्तकाचे प्रकाशक सोहळा आयोजित करण्यात आला यासाठी प्रमुख व्याख्याते माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचे आजचे शिक्षण व तणावमुक्ती या विषयावर सर्वाना मनमुराद हसवत व्याख्यान दिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी येथील न्यायाधीश सुदाम श्रीराम काळे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दि. पिपल्स एज्युकेशनल सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, पोपटराव काळे, आदर्श शिक्षक मनोहर इनामदार, गोकुळ गायकवाड, अनंता खेत्रे, संजय वराट, दत्तात्रय काळे, दशरथ कोपनर, आय. य. पवार, भानुदास बोराटे, ओंकार देशमुख, विनायक राऊत, मयुर भोसले, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अशोक वीर, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, किरण रेडे तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, मेरा धरती सुरज परिवाराचे संतोष पवार, विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांभळे व जिव्हाळा फाऊंडेशन जामखेड हे होते.

यावेळी बोलताना माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर म्हणाले की, ताणतणाव कमी करण्यासाठी अपेक्षा कमी ठेवा परीक्षेचा ताण घेऊ नका मन मोकळे करा नियमित व्यायाम, चालणे, सूर्यनमस्कार, सायकलिंग असे व्यायाम करा नेहमी हसत रहा यामुळे जीवनातील ताणतणाव कमी होईल असे सांगितले. चांगले उपक्रम राबवा आमचे नेहमीच सहकार्य करू आणी जामखेड तालुका राज्यात अग्रेसर करू असे आवाहन शिक्षकांना केले.

माजी शिक्षणाधिकारी पोपटराव काळे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करून घेण्यासाठी शास्ती न लावता गोड बोलून आपण चांगले काम करून घेऊ शकतोत. मला परिस्थितीने घडविले जाणिव ठेवून काम पाहिले दुष्काळाच्या काळात सर्व शिक्षकांना एकत्रीत घेऊन झपाटून काम केले वर्षभरात ऐंशी शाळेत मुक्काम केला पाच कोटी रुपये लोकवर्गणी गोळा केली तालुक्यातील १०२ शाळा आयएसओ केल्या शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेले जामखेड शैक्षणिक पर्यटन झाले. सर्व काम सामाजिक बांधिलकी म्हणून केले. परिस्थितीने घडलो ऊसतोड कामगाराचा मुलगा अधिकारी झाला असे काळे यांनी सांगितले.

जामखेड येथे जिव्हाळा फाऊंडेशनच्या पुढाकारातून झालेल्या संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या साठी प्रमुख व्याख्याते माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचे आजचे शिक्षण व तणावमुक्ती या विषयावर सर्वाना मनमुराद हसवत व्याख्यान दिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी येथील न्यायाधीश सुदाम श्रीराम काळे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दि. पिपल्स एज्युकेशनल सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, पोपटराव काळे, आदर्श शिक्षक मनोहर इनामदार, गोकुळ गायकवाड, अनंता खेत्रे, संजय वराट, दत्तात्रय काळे, दशरथ कोपनर, आय. य. पवार, भानुदास बोराटे, ओंकार देशमुख, विनायक राऊत, मयुर भोसले, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अशोक वीर, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, किरण रेडे तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, मेरा धरती सुरज परिवाराचे संतोष पवार, विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांभळे व जिव्हाळा फाऊंडेशन जामखेड हे होते.

न्यायाधीश सुदाम काळे, मनोहर इनामदार, गोकुळ गायकवाड यांनी आपले मनोगते व्यक्त केली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर व अनिल देडे यांनी केले. तर आभार गुलाब जांभळे यांनी मानले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!