जामखेड न्युज——
बिभीषण धनवडे आयोजित हळदी कुंकू व खेळ पैठणीच्या कार्यक्रमात गर्दीचा उचांक!!!
पल्लवी तुषार गोलेकर यांनी जिंकली प्रथम क्रमांकाची पैठणी
मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा न्यु होम मिनिस्टरचा भरगच्च कार्यक्रम ल. ना. होशिंग विद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला होता. यासाठी अभिनेता क्रांती ( नाना) मळेगांवकर गप्पा, गोष्टी, रंजक खेळासोबत गावरान काँमीडीचा तडका झाला तसेच बालगायीका टी. व्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर हिने माताभगिनींची मने जिंकली. या कार्यक्रमात आतापर्यंतचा गर्दीचा उचांक झाला संपूर्ण मैदान गर्दीने खचाखच भरले होते.
सिने कलावंत क्रांती नाना मळेगांवकर आणि टिव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर यांनी सादर केलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने प्रचंड धम्माल उडवून दिली. हा कार्यक्रम तब्बल पाच तास चालला. या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळ, नृत्य सादर केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसून आला. तरूण मुली, महिला आणि वृध्द महिलांनी कार्यक्रमात मोठी
धम्माल उडवून दिली.
यावेळी पार पडलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात
पहिला क्रमांकाची पैठणी पल्लवी तुषार गोलेकर यांनी जिंकली. १२५५१ रूपयांची पैठणी जिंकलीद्वितीय क्रमांकाची पैठणी अनिता मारुती गिते यांनी
७००० रुपयांची पैठणी जिंकलीतृतीय क्रमांकाची पैठणी दैवशाला गणेश गुळवे यांनी ५०००रूपयांची पैठणी जिंकली
चौथ्या क्रमांकाची पैठणी संध्या अनंता आष्टेकर यांनी २१०० रूपयांची पैठणी जिंकली
पाचव्या क्रमांकाची पैठणी वर्षा सागर माकुडे यांनी १५०० रूपयांची पैठणी जिंकली.
येणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, नगरसेवक अमित चिंतामणी, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, प्रा. अरूण वराट, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, रमेश वराट, सुमीत वराट, गोरख घनवट, श्याम धस, संजय राऊत, सलीम तांबोळी, प्रा कैलास माने, सलीम बागवान, महेश मासाळ, तात्याराम पोकळे, मोहन देवकाते, जयसिंग उगले, वैभव कार्ले, ऋषीकेश मोरे, शुभम धनवडे, रवी सुरवसे, अँड प्रविण सानप, लहू शिंदे, उद्धव हुलगंडे, प्रविण चोरडिया, डॉ. विठ्ठल राळेभात, शिवकुमार डोंगरे, विकी उगले यांच्या सह जगदंबा महिला मंडळातील बहुसंख्य महिला व अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक बिभीषण धनवडे यांनी करताना सांगितले की, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन मोकळे करण्यासाठी महिलांना खळखळून हसवण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवगंगा मत्रे व हनुमंत महाराज निकम यांनी केले.