जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जगतगुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त श्री.विठ्ठल मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरवात झाली आहे. या सप्ताहामध्ये बहुसंख्येने गाथा पारायण वाचक बसलेले असून या सर्वांना व सप्ताहामध्ये सेवा देणाऱ्या यजमानांना विठ्ठल आण्णा राऊत यांच्या समरणार्थ गाथा परायनाचे वाटप करण्यात आले.
ADVERTISEMENT

संत साहित्याचे परंपरेनुसार पूजन करून ह.भ.प.विजयकुमार बागडे सर व्यासपीठ चालक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली आहे. दररोज सायंकाळी ७ ते ९ नामांकित किर्तनकारांची किर्तने होणार आहेत. तरी या सप्ताहाची सांगता २१ मार्च रोजी काल्याच्या किर्तनाने होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रा.मधुकर राळेभात, संचालक गुलाब जांभळे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अंकुश उगले, पंढरीनाथ राजगुरू,अशोक मुळे, सीताराम राळेभात, राहुल राळेभात, राजेंद्र राळेभात, आबासाहेब वीर, गोरोबा पतसंस्थेचे चेअरमन विनोद राऊत, पांडुरंग भोसले हे उपस्थित होते.
रविवार दि. २० रोजी दुपारी ३ ते ६ श्री जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही विनंती विठ्ठल भजनी मंडळ, व शिवजयंती महोत्सव समिती च्या आयोजकांनी केली आहे.