पंधरा दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी, मंगेश अशोक थोरवे यांचे निधन

0
1608

जामखेड न्युज—–

पंधरा दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी, मंगेश अशोक थोरवे यांचे निधन

जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील मंगेश अशोक थोरवे यांचा दि. २७ जुलै २०२५ रोजी जामखेड जवळील बीड रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर अपघात झाला होता. यात मंगेश गंभीर जखमी झाला होता त्यास अहिल्यानगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवस मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली शनिवारी सायंकाळी मंगेश थोरवे यांनी अखेरचा निरोप घेतला.

दि. २७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच च्या आसपास बीड रोडवरील फरशीच्या दुकानातून जामखेड कडे मोटारसायकल वर येत असताना पाठीमागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले होते.

मंगेश अशोक थोरवे यांचे बीड रोडवर फरशीचे दुकान आहे दुकानातून जामखेड मध्ये येत असताना केज जि बीड येथील टाटा नेक्सन गाडीने मागून धडक दिली यात ते गंभीर जखमी झाले होते. ताबडतोब नगर येथील हाँस्पीटल मध्ये दाखल केले होते. पंधरा दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे.

दि २७ जुलै रोजी अपघात झाला होता. नगर येथे उपचार घेत असताना शनिवार दि. ९ आँगस्ट रोजी सायंकाळी निधन झाले. निधनाची बातमी कळताच सावरगाव, जामखेड परिसरात शोककळा पसरली. रात्री दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेश अशोक थोरवे हे फरशीचे दुकान चालवत होते त्यांच्या मागे आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे. दोन भाऊ व वडील फरशी बसवण्याचे काम करतात.

मंगेश च्या अपघाती निधनामुळे जामखेड, सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here