जामखेड न्युज – – – –
निवडणूक आली की शेतकर्यांचे वीजबील माफीची घोषणा राजकीय पक्ष करतात पण सत्तेवर येताच सारे विसरून जातो. शेतकर्यांचे पिक जोमात आले व त्याला पाण्याची गरज लागली की महावितरण वीज तोडते. रोहीत्र जळाले तर भरण्यासाठी पैसे घेतले जाते त्यामुळे शेतकऱ्याची चौहोबाजूनी गोची केली जाते. शेतकर्यांना तुमची वीज फुकट नको आम्ही पैसे द्यायला तयार आहोत पण वीज दिवसा दहा तास द्यावी, ग्रामीण भागात रोहीत्र बंद केले ते त्वरित चालू करावे, वस्त्यावरील वीज चालू ठेवावी अन्यथा आमचा लढा चालूच राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी दिला.
शेतक-यांना दिवसा लाईट मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी रोको आंदोलन केले. यावेळी मंगेश आजबे बोलत होते. यावेळी चक्का जाम आंदोलनाला जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कृष्णा डूचे, जामखेड शहर अध्यक्ष भाऊसाहेब डोके, नितीन जगताप तालुका कार्याध्यक्ष जनर्धन भोंडवे, मंगेश मुळे, गणेश परकाळे, बंडू मुळे, बाबू साळुंके, योगेश मुळे, सोमनाथ शिंदे, बंडू मामा, बाळासाहेब ठाकरे, संजय ढोले, अजय वाकळे, ज्ञानेश्वर डूचे, अनिल ठाकरे, अंकुश सांगळे, शरद डूचे, बबन सातपुते, वैभव डूचे इत्यादी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, राहुल पवार यांची भाषणे झाली. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे व कार्यकर्ते यांनी नायब तहसीलदार सुनील भोसेकर यांना निवेदन दिले.त्यांनी तुमच्या मागणीबाबत महावितरण व वरीष्ठांना पाठवले जाईल असे आश्वासन दिले यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.