जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
पंचायत समिती जामखेड येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री.नागनाथ मालाजी शिंदे यांची जि.प.बीड येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने शिक्षक बँक,शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ जामखेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक बँक संचालिका सीमाताई निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तारअधिकारी श्री.लक्ष्मीकांत देशमुख हे होते.या कार्यक्रमास उपस्थित शिक्षक नेते राम निकम, हनुमंत निंबाळकर, शिवाजी हजारे, प्रवीण पवार, मनोज दळवी, सुशेन चेंटमपल्ले, अभिमान घोडेस्वार, अतुल कोल्हे, विठ्ठल जाधव, राजेश्वर डुपलवाड, विठ्ठल घोडे, बजरंग देशमुख, बळीराम जाधव ,ब्रहमदेव हजारे , दत्तात्रय आंधळकर, रविंद्र तांबे, राजेंद्र मोहळकर, नारायण लहाने व दीपक तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक ते शिक्षणाधिकारी हा प्रेरणादायी प्रवास विषद केला.नेहमी चांगले विचार ठेवून चांगले काम केले तर त्याचे फळ निश्चित चांगले मिळते, मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागलेपरंतु कोरोना काळात तालुक्याचे उत्कृष्ठ काम झाले याचा मला आनंद आहे,अपयशाने खचून न जाता जीवनातील कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. अभ्यासूवृत्ती , प्रामाणिकपणा, वक्तशिरपणा, जिद् ,चिकाटी व समर्पण अंगी बाणल्यास यश हे नक्की मिळते असा मौलिक सल्ला उपस्थित शिक्षकांना दिला.मी जरी बीड येथे गेलो तरी आपल्या अडीअडचणी व मदतीसाठी नेहमी आपल्या सोबत आहे असेही नागनाथ शिंदे म्हणाले.
शिक्षक बँकेच्या संचालिका सीमाताई क्षिरसागर (निकम ) ,विस्तारअधिकारी लक्ष्मीकांत देशमुख व हनुमंत निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या अभ्यासू व कष्टाळूपणाचे कौतुक करुन त्यांचे पदोन्नतीबद्दल अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम निकम यांनी केले, सूञसंचलन सुशेन चेंटमपल्ले यांनी तर आभार शिवाजी हजारे यांनी मानले.