Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या सोन्या बैल ठरला महाराष्ट्र हिंद केसरीचा मानकरी

सोन्या बैल ठरला महाराष्ट्र हिंद केसरीचा मानकरी

0
361
जामखेड न्युज – – – 
साताऱ्यामधील पुसेगाव प. पु. श्री सेवागिरी महाराज यांच्या समाधी संजीवनी सोळ्यानिमित्त डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या. या बैलगाडा शर्यतींमध्ये तब्बल ४२५ बैलगाड्यांची नोंद झाली होती. ५८ फेरे व सेमीफायनलच्या ८ फेऱ्या पार पडल्या. यानंतर फायनल मध्ये १० बैलगाडा शर्यती बिनजोड असलेल्या डोंबिवली मधील सोनारपाडा गावातील जयेश पाटील यांच्या सोन्या बैलाला हिंद केसरीचा मान देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी होण्याचा मान हा सोन्याला बैलगाडा चालकांनी आणि मालकांनी त्याची फटाके, बेंज्यो आणि गुलालाची उधळण करत गावात मिरवणूक काढली आहे. यापूर्वीही सोन्या बैलाने अनेक मोठं मोठ्या बैलगाडा शर्यतींवर आपले नाव कोरले आहे. २०१६ साली हा बैल सोनार पाड्यातील रहिवासी जयेश पाटील यांनी खरेदी केला आहे. याआधी दोन वर्ष मोठा सोन्या हा दापोड्या मध्ये शर्यतींमध्ये पळत होता. मोठा सोन्या शर्यतीसाठी मैदानात उतरताच त्याच्या विरोधात लवकर कोणतेही प्रतिस्पर्धी शर्यतीसाठी तयार होत नाहीत. त्यामुळे मोठ्या सोन्या बैलाची जोरदार चर्चा ही बैलगाडा मैदानासह गावागावात सुरु असते.
सोन्याचा खुराक
उडदाची डाळ, गव्हाचा आटा, शेंगदाण्याची पेंड, मक्याचा भरडा, ८ लीटर दुध, ५ ते ६ अंडी, गाजर, मक्याची कणस, उसाचा वाडा, ज्वारीचे भाटूक, हिरवा मका असे खाद्य त्याला दिले जाते. बैलांना दूध व अंडी भरपूर प्रमाणात मिळावे म्हणून पाटील यांनी म्हशी व कोंबड्या देखील पाळल्या असल्याचे केशव सांगतात.
सोन्याच्या सेवेत यांची साथ
स्पर्धेच्या ठिकाणी सोन्या जातो तेथे श्याम कारभारी, मुकूंद म्हात्रे, परेश भंडारी, समीर भोईर यांची खंबीर साथ सोन्याला असते. तर धरम पाटील, अमित पाटील, संकेत गायकर, चेतन मढवी, भावेश शिंदे, रोशन पाटील, सुमित विटकर, विशाल पाटील, योगेश फौजदार, हेमंत म्हात्रे हे सोन्याच्या सेवेत असतात.
सोशल मीडियावर १० हजार पेक्षा सोन्याचे अधिक फॅन्स
सोन्या बैलाचे चार राज्यात दहा हजार पेक्षा अधिक फॅन्स आहेत. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात सोन्याचे फॅन्स आहेत. मध्य प्रदेश,कर्नाटक,महाराष्ट्र,पंजाब आदी राज्यात सोन्याचे फॅन्स असल्याचे जयेश पाटील यांनी सांगितले आहे. डोंबिवली मधील सोनारपाडा गावात असलेल्या या सोन्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!