जामखेड प्रतिनिधी
महेश राळेभात मित्रमंडळाच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमात प्रत्येक महिलेला एका झाडाचे व चिमुकल्यांना पतंगाचे वाटप करण्यात आले यावेळी सर्वासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
महेश राळेभात मित्रमंडळ नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. कोरोना काळात शहरातील अनेक गोरगरीब जनतेला किराणा किटचे वाटप करून मोठा दिलासा दिला होता तसेच लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले होते.

स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड शहराला पहिल्या पाच मधे आणण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न सुरु केले आहेत. सुनंदाताई पवार यांनी महिलांना आवाहन केले होते की, संक्रांतीचे वाण म्हणून झाडे देण्यात यावीत याला प्रतिसाद देत महेश राळेभात मित्रमंडळाच्या महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते व प्रत्येक महिलेला झाडांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर महिलांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. महिलांना झाडे व लहान मुलांना पतंगाचे वाटप करण्यात आले यामुळे चिमुकल्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसुन आला.

यावेळी सिंधु रामचंद्र राळेभात, तेजश्री महेश राळेभात, शुभांगी प्रशांत वारे, प्राजक्ता अमोल दांगट, माधुरी संतोष पवार, रश्मी अमृत मते, कोमल मनोज राळेभात,
मंगल सोमनाथ पोकळे, वंदना नागेश कात्रजकर यांनी येणाऱ्या महिलांचे स्वागत केले तसेच प्रत्येकास झाडांचे वाटप करण्यात आले सर्वासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.