झालेल्या रस्त्याचे काम दिसत नसेल तर विरोधकांनी डोळ्याच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन करुन घ्यावे – माजी ग्रामपंचायत सदस्य मारूती बेलेकर

0
284

जामखेड प्रतिनिधी

   मोहा ग्रामपंचायत निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर करूनही दारूण पराभव झाल्याने आलेल्या नैराश्यातून
विरोधक चुकीचे आरोप करत आहेत. त्यांना जर झालेले रस्त्याचे काम दिसत नसेल तर त्यांनी डोळ्याच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन करून घ्यावे व नंतर ते कामे पाहावेत असे माजी ग्रामपंचायत सदस्य मारूती बेलेकर यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिले.
झालेले काम

     मोहा या ठिकाणी रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे असे लहू डोंगरे व काही लोकांनी या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. प्रत्यक्षात गेल्या जून 2019 पासून रोजगार हमीची कामे कोरोना महामारी मुळे बंद आहेत. त्या आगोदर रोजगार हमीतुन दोन रस्त्यांचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे तसेच एका रस्त्याचे एकच मस्टर निघाले आणी कोरोना मुळे कामे बंद आहेत. त्या काळात जे मजुर कामावर होते त्या मजुरांचे आॅनलाईन मस्टर तसेच त्यांचे पगार बॅंकेत त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. कसलाही भ्रष्टाचार या कामात झालेला नाही. विरोधक म्हणतात रोजगार हमीची कामे सुरू आहेत पण मजूर नाहीत सध्या कामेच बंद आहेत. त्यामुळे विरोधकांना ग्रामपंचायत मध्ये सलग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. ते 2010 ते 15 मध्ये सत्तेवर आसताना गावात कलाकेंद्र व अवैद्य धंदे यांना पाठिशी घालत मोठी माया कमावली होती. व ग्रामपंचायत मध्ये अवैध धंद्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे पण हे ओळखून  जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मोठय़ा प्रमाणावर पैशाचा वापर करूनही दारूण पराभव झाल्याने आलेल्या नैराश्यातून चुकीचे आरोप करत आहेत. जे कामे झालेली आहेत ते समोर आहेत विरोधकांना ते दिसत नसतील तर त्यांनी डोळ्याच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन करून मग कामे पाहावेत मग त्यांना दिसतील असेही बेलेकर म्हणाले.
काम सुरू आसताना
    जे आज आमच्या विकासकामांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत यांनी 2010 ते 2015 या काळात लाखो रुपये बिल रोजगार हमीच्या माध्यमातुन बोगस बिल काढले तेच लोक आज निवेदन देतात ते मोठे आश्चर्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here