जामखेड प्रतिनिधी
कोल्हापूरी बंधाऱ्यातील पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल या पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी चांगली पीके घ्यावीत व आपले जीवन समृद्ध करावे असे मत आमदार रोहित पवार यांनी भुतवडा, लेहनेवाडी येथील बंधाऱ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

भुतवडा व लेहनेवाडी येथील बंधाऱ्याचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी कर्जत-जामखेडचे विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, अॅड हर्षल डोके, अनिल ( मामा ) बाबर, विकास (तात्या) राळेभात, जयसिंग डोके, श्रीराम डोके, आकाश डोके, विकास गाडे, शिवाजी राळेभात, आप्पासाहेब मोरे, संजय डोके, गणेश डोके, सचिन डोके, किसन पवार, दादासाहेब रिटे, बाळासाहेब चौधरी यांच्या सह भुतवडा व लेहनेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. जे शेतकरी हिताचे निर्णय असतील तेच निर्णय घेतले जातील यावेळी ग्रामस्थांनी आमदार रोहित ( दादा ) पवार यांचा सत्कार केला.