ल. ना. होशिंग विद्यालयाचा अॅथलेटिक्समध्ये दबदबा! तब्बल २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकांची लयलूट; १ व २ ऑक्टोबरला प्रवरा नगर येथे रंगणार जिल्हास्तरीय स्पर्धा
ल. ना. होशिंग विद्यालयाचा अॅथलेटिक्समध्ये दबदबा! तब्बल २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकांची लयलूट; १ व २ ऑक्टोबरला प्रवरा नगर येथे रंगणार जिल्हास्तरीय स्पर्धा
लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, खर्डा येथे दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पावसाळी तालुकास्तरीय मैदानी अॅथलेटिक्स स्पर्धेत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगरचे संतोष वाबळे, तसेच रंजन तडवी यांनी खर्डा येथे सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांना भेट देत खेळाडू विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये विद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळविले. विशेष म्हणजे या सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंची दि. १ व २ ऑक्टोबर रोजी प्रवरा नगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
🏆 १४ वर्षे वयोगट यशश्री बोराटे हिने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. आदित्य गुळवे याने गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 🥇 १७ वर्षे वयोगट पृथ्वीराज डाडर — गोळाफेक व थाळीफेक प्रथम पायल गवळी — गोळाफेक व थाळीफेक प्रथम यश देडे — ४०० मीटर व २०० मीटर धावणे प्रथम तर, नेत्रा गवळी — थाळीफेक द्वितीय प्रिया पवार — गोळाफेक द्वितीय अर्थव राऊत — थाळीफेक द्वितीय गायत्री शिरसाठ — भालाफेक द्वितीय ज्योतीराम वाघमोडे — गोळाफेक द्वितीय
🏅 १९ वर्षे वयोगटातही दमदार कामगिरी सिद्धी रासकर — थाळीफेक प्रथम फरहान शेख — थाळीफेक प्रथम अमित जाधव — भालाफेक प्रथम यश हाळनोर — ४०० मीटर व २०० मीटर धावणे प्रथम श्रुती तांबे — लांब उडी प्रथम कल्याणी जगदाळे — गोळाफेक प्रथम तर, ओम काळे — लांब उडी द्वितीय शिवप्रसाद डोके — १५०० मीटर धावणे द्वितीय आदित्य क्षीरसागर — २०० मीटर धावणे द्वितीय प्रथमेश चव्हाण — ३००० मीटर धावणे द्वितीय गीता खुपसे — ४०० मीटर धावणे द्वितीय कोमल वायफळकर — गोळाफेक द्वितीय याशिवाय १९ वर्षे वयोगटातील ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळवत विशेष कामगिरी केली.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या सर्व खेळाडूंची दि. १ व २ ऑक्टोबर रोजी प्रवरा नगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेतही ल. ना. होशिंग विद्यालयाचे खेळाडू आपली चमक दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. खेळाडूंना क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, प्रल्हाद साळुंके, बापू जरे व धीरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्यासह सर्व अध्यापक, अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
ल. ना. होशिंग विद्यालयाच्या या यशामुळे जामखेडच्या क्रीडा क्षेत्रात विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.