एसटी संपावर उद्या उच्च न्यायालयात सुनावणी

0
239
जामखेड न्युज – – – – 
 शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या साडेतीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत़
संपावर तोडगा काढण्यात एसटी महामंडळाला यश आलेले नसून, मंगळवार, २२ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े. दरम्यान या संपकाळात एसटीचे १,६०० कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी सेवा बंद आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
संप करणाऱ्यांपैकी काही जणांनी स्थानिक पातळीवर माघार घेतली आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी संप सुरू आहे. या संपामुळे आतापर्यंत एसटी महामंडळाचे सुमारे १६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले; असे राज्य शासनाचे म्हणणे आहे.
संपकाऱ्यांची अशी आहे आकडेवारी
एसटीच्या ८२ हजार ४८९ कर्मचाऱ्यांपैकी ५४ हजार ३९६ अद्याप संप करत आहेत. आतापर्यंत २८ हजार ९३ कर्मचारी कामावर परतले आहेत. २५ हजार चालक आणि २० हजार २१२ वाहक संप करत आहेत.
दररोज एसटीला ४ कोटी रुपयांचे
उत्पन्न महाराष्ट्रात सध्या दररोज एसटीच्या दहा हजार फेऱ्या होत आहेत. रोजची प्रवासी संख्या ७ लाखांपेक्षा जास्त आहे. यामुळे दररोज एसटीला ४ कोटी रुपयांचे उत्पन्न होत आहे. पण अनेक कर्मचारी संपावर असल्यामुळे एसटी सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here