जामखेड व प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
पंढरपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुशील बेलेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रत्येक ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पंढरपूर पायी वारीचे उत्तम नियोजन केल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून यांचा गौरव करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज ,कार्यकारी अधिकारी गजानन गुरव साहेब, सदस्य भगरे गुरुजी आणि देशमुख महाराज उपस्थित होते.
यावेळी बोलताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज म्हणाले कित्येक वर्षापासून आम्ही मंदिराचे काम पाहतो पण आमचे तहसीलदार सुशील बेलेकर साहेब यांच्या सारखे कार्य आम्ही आत्तापर्यंत पाहिले नाही त्यांनी पायी दिंडीचे नियोजन खूप चांगल्या प्रकारे केले होते त्यामुळे कसलीच अडचण आली नाही
त्यामुळे आमच्या कमिटीने ठराव घेऊन तहसीलदार साहेबांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला
बेलेकर साहेबांचा सत्कार झाल्याची बातमी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळाली त्यांनीसुद्धा साहेबांचे अभिनंदन केले यावेळी बोलताना कोठारी म्हणाले आमच्या जामखेडला साहेब तीन ते चार वर्षे होते त्यांच्या काळामध्ये खूप चांगले काम झाले त्यांनी अहोरात्र काम करुन जामखेडच्या लोकांना वळण लावले
तहसिल कार्यालय आवारात लावलेली झाडे आज डेरेदार झालेली आहेत तहसिल परिसर हरित झालेले आहे.
यावेळी बोलताना सुशील बेलेकर म्हणाले हे तर माझे कामच आहे मी सर्व काम माझ्या घरचे आहे असे समजून काम करत असतो मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला मानपान काही लागत नाही आणि माझे मी भाग्य समजतो पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणच्या तहसीलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली